शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हिमा दासची ‘सुवर्ण’ धाव कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 04:20 IST

२०० मीटर शर्यतीत हिमाने २३.४३ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.

नवी दिल्ली : मोहम्मद अनसने चेक प्रजासत्ताक येथील क्लादनो अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत आपल्या राष्ट्रीय विक्रमामध्ये सुधारणा करत सुवर्ण पटकावत विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली. दुसरीकडे, महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत हिमा दासने दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत तिसरे सुवर्णपदक पटकावले.२४ वर्षीय अनसने शनिवारी रात्री ४५.२१ सेकंद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. तो पोलंडच्या रौप्यपदक विजेत्या ओमेलको रफालच्या (४६.१९) तुलनेत एका सेकंदाने पुढे राहिला. अनसने गेल्या वर्षी ४५.२४ सेकंद वेळेचा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्याने हा विक्रम मोडताना २७ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत होणाऱ्या दोहा विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली.२०० मीटर शर्यतीत हिमाने २३.४३ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २३.१० सेकंद अशी आहे. तिने ११ दिवसांत तिसरे सुवर्ण जिंकले. याआधी हिमाने २ जुलैला पोंजनान व ७ जुलैला कुंटो स्पर्धेत २०० सुवर्णपदक पटकावले होते.>भारताच्या विपिन कासना, अभिषेक सिंग आणि देवींदर सिंग कांग यांनी पुरुषांच्या भालाफेक फायनलमध्ये अनुक्रमे ८२.५१ मीटर, ७७.३२ मीटर आणि ७६.५८ मीटरचे अंतर गाठताना अव्वल तीन स्थान पटकावले. पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमवीर तेजिंदर पाल सिंग तूरने कांस्यपदक जिंकताना २०.३६ मीटर अंतर गाठले. त्याचा राष्ट्रीय विक्रम २०.७५ मीटरचा आहे.महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेत व्ही.के. विस्मयाने ५२.५४ सेकंद वेळेसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करीत अव्वल स्थान पटकावले. सरिताबेन गायकवाड ५३.३७ सेकंद वेळेसह तिसºया स्थानी राहिली. दरम्यान, किर्गिस्तानमधील बिश्केकमध्ये आंतरराष्ट्रीय स्मृती स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले.राष्ट्रीय विक्रमवीर एम. श्रीशंकरने लांब उडीमध्ये ७.९७ मीटरचे अंतर गाठत विजय मिळवला. अर्चनाने १०० मीटरमध्ये (११.७४ सेकंद), हर्ष कुमारने ४०० मीटरमध्ये (४६.७६ सेकंद), लिली दासने १५०० मीटरमध्ये (४:१९.०५), भालफेकमध्ये साहिल सिलवालने (७८.५० मीटर) आणि महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले संघाने (४५.८१ सेकंद) सुवर्णपदकाचा मान मिळवला. राहुल (१५०० मीटर, ३:५०.६९), जिस्ना मॅथ्यू (४०० मीटर, ५३.७६) आणि गजानंद मिस्त्री (४०० मीटर, ४७.२३) यांनी रौप्य, तर रोहित यादवने भालाफेकमध्ये (७३.३३ मीटर) कांस्यपदक पटकावले.