शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

अभिनंदन; भारताची सुवर्णकन्या हिमा दास बनली DSP!

By स्वदेश घाणेकर | Updated: February 26, 2021 17:12 IST

भारताची आघाडीची धावपटू हिमा दास ( Hima Das) हीनं शुक्रवारी आसाम पोलिस दलात उपअधीक्षक ( Deputy Superintendent ) म्हणून शपथ घेतली.

भारताची आघाडीची धावपटू हिमा दास ( Hima Das) हीनं शुक्रवारी आसाम पोलिस दलात उपअधीक्षक ( Deputy Superintendent ) म्हणून शपथ घेतली. यावेळी गुवाहाटी राज्याचे अनेक मंत्री उपस्थित होते. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या हिमा दासचा भारतीय क्रीडाविश्वातील प्रवास थक्क करणारा आहे. आसाममधील धिंग गावातील तिचा जन्म. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मल्यानं आर्थिक चणचणी ही तिनं बालपणापासूनच पाहिली. शाळेत असताना तिला फुटबॉलचं वेड होतं आणि ती मुलांसोबत फुटबॉलही खेळायची. पण, शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या गुरुजींनी तिला धावपटू होण्याचा सल्ला दिला आणि तिचं नशीबच बदललं.

२०१८मध्ये कनिष्ठ जागतिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून हिमा प्रसिद्धीझोतात आली. या स्पर्धेत ट्रॅक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. या स्पर्धेत तिनं ५०.७९ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमही केला. ट्रॅकवरच नव्हे तर हिमानं कोरोना काळात सामाजिक भान राखत अनेकांना मदत केली. आसाममध्ये आलेल्या पुरात अनेकांचा मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठीही हिमानं पुढाकार घेतला होता.    दरम्यान, भारताची स्टार धावपटू हिमा दास ( Hima Das) ही जवळपास दीड वर्षानंतर ट्रॅकवर उतरली आणि तिनं पहिल्याच स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. इंडियन ग्रा प्री २ च्या महिला गटात तिनं हे यश मिळवले.  आसामच्या धावपटू हिमा दासनं २३.२१ सेकंदाची वेळ नोंदवली. दुखापतीमुळे आणि त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ती बराच काळ ट्रॅकपासून दूर होती. हिमानं सुवर्णपदक जिंकले असले तरी तिला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची २२.८० सेकंदाची पात्रता वेळ गाठता आली नाही.  एप्रिल २०१९मध्ये तिला दुखापत झाली आणि तिनं फक्त १०० व २०० मीटर शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले.  २०० मीटर शर्यतीत हिमासह फक्त एक स्पर्धक धावली. दिल्लीच्या सिमरनदीप कौरनं २४.९१ सेंकदाची वेळ नोंदवली. 

टॅग्स :Hima Dasहिमा दासguwahati-pcगौहतीAssamआसाम