शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास Hima Das! आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 12:58 IST

Hima Dasच्या या कृतीचं क्रीडा विश्वातून होतंय कौतुक...

भारताची सुवर्ण कन्या हिमा दास हिच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहरीन संघाने सुवर्णपदक नावावर केले होते, परंतु त्यांची धावपटू केमी ॲडेकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे भारताचे रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रुपांतरीत झाले. कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रीडापटूंसाठी ही खूप मोठी आनंदाची वार्ता ठरली. हिमानं हे सुवर्णपदक कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित केलं आहे. ( Hima Das delicated her upgraded gold medal to Coronawarriors)

भारताच्या या संघात हिमासह मोहम्मद अनास, पूवम्मा आणि अरोकीया राजीव यांचा समावेश होता. भारतीय ॲथलेटिक्स संघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,"आता भारताच्या खात्यात ॲथलेटिक्स विभागात ८ सुवर्णपदकासह २० पदकं झाली आहेत. या आनंदाच्या बातमीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंचे मनोबल उंचावण्यास मदत होईल." ( Hima Das delicated her upgraded gold medal to Coronawarriors)

हिमाने या स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर रिले महिला गटात सुवर्ण, तर ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले गटात भारतीय खेळाडूंनी ३ मिनिटे १५.७१ सेकंदाची वेळ नोंदवली होती. आजच्या निर्णयाने मिश्र गटातील पहिले विजेते हा मानही भारताला मिळाला आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 13 लाख 39,067 इतकी झाली आहे. त्यापैकी 8 लाख 50,295 रुग्ण बरे झाले आहेत, तर 31,425 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. या संकटात कोरोनाशी दिवसरात्र मुकाबला करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आदी कोरोना वॉरियर्सचे सर्वच आभार मानत आहेत. पण, हिमानं आशियाई स्पर्धेतील हे सुवर्ण वॉरियर्सना समर्पित करून त्यांचे आभार मानले आहेत. ( Hima Das delicated her upgraded gold medal to Coronawarriors)

''आशियाई स्पर्धा 2018तील 4 बाय 400 मीटर मिश्र रिले स्पर्धेतील सुवर्णपदक मी डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित करत आहे. या आव्हानात्मक परिस्थिती आपल्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी हे वॉरियर्स नि: स्वार्थपणे सेवा करत आहेत. त्यांना सलाम,''असे हिमानं ट्विट केलं. 

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल! 

140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video

टॅग्स :Hima Dasहिमा दासcorona virusकोरोना वायरस बातम्याAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा