हिसार - हरियाणातील वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बूराने तिचा पती भारतीय कब्बडी टीमचा माजी कॅप्टन दीपक हुड्डावर मारहाणीचा आरोप लावला आहे. पती दीपकने १ कोटी रूपये आणि फॉर्च्यूनरची मागणी केल्याचा दावा स्वीटीने केला आहे. दीपक हुड्डा याच्या कुटुंबाने संपत्ती हडपण्यापासून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत स्वीटीने बूराने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वीटी बूराने या प्रकरणी कोर्टात नुकसान भरपाई आणि घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. हिसारच्या पोलीस अधीक्षकांनी दीपक हुड्डा याला नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले परंतु तो आला नाही. अलीकडेच स्वीटी बूराला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी २०२० साली दीपक हुड्डाला अर्जुन पुरस्कार मिळाला होता. स्वीटी बुराने दीपकसोबतचे फोटो सोशल मीडियावरून हटवले आहेत.
कशी झाली दोघांमध्ये मैत्री?
२०१५ साली मॅरेथॉनमध्ये मुख्य अतिथी म्हणून आलेल्या या दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. २०२२ मध्ये या दोघांनी लग्न केले. लग्नानंतरही दोघांनी आपापला खेळ सुरूच ठेवला. स्वीटी बूरा लग्नानंतर बॉक्सिंमध्ये जागतिक चॅम्पियन झाली. २०२४ मध्ये दीपक हुड्डाने महम विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढली आणि ते हरले. स्वीटी बुरालाही बरवाला येथून निवडणूक लढवायची होती परंतु त्यांना भाजपाकडून तिकिट मिळाले नाही. स्वीटी बुराने घटस्फोट घेण्यासाठी पोटगी म्हणून ५० लाख आणि दीड लाख महिना मासिक खर्च देण्याची मागणी कोर्टात केली आहे.
दीपक हुड्डाने आरोप फेटाळले
दरम्यान, पती दीपक हुड्डानेही पत्नी स्वीटी बुराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्वीटी बूराचे आई वडील व्याजावर पैसे मागण्याच्या बहाणे मला फसवत राहिले. हिसारमध्ये त्यांनी सेक्टर १-४ प्लॉट खरेदी केला होते. फसवणुकीतून ते फ्लॅट माझ्या आणि स्वीटीच्या नावै केली.
दरम्यान, दीपक हुड्डासोबत स्वीटीचं ७ जुलै २०२२ मध्ये लग्न झाले. आई वडिलांनी माझ्या लग्नासाठी १ कोटीहन अधिक खर्च केला. दीपक आणि त्याच्या बहिणीने माझ्याकडे फॉर्च्यूनर गाडी मागितली. खेळ सोडण्याचा दबावही आणला. २०२४ च्या हरियणात निवडणुकीत पतीने मला १ कोटी रूपये आणण्यास सांगितले. ऑक्टोबर २०२४ मध्ये मारहाण करून मला घरातून बाहेर काढले असा आरोप स्वीटी बूराने केला आहे.