शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा डी गुकेश बनला बुद्धीबळाचा नवा King; चीनी ग्रँडमास्टरला चारली पराभवाची धूळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:13 IST

Gukesh D World Chess Champion: भारताचा युवा बुद्धीबळपटू डी गुकेशने सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान पटकावला आहे.

Gukesh D World Chess Champion: भारताचा युवा स्टार डी गुकेश (Gukesh D) बुद्धिबळ विश्वाचा नवा चॅम्पियन बनला आहे. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी, 12 डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली, पण अखेरला 18 वर्षीय गुकेशने सामना आपल्या नावावर केला. 

सिंगापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चीनचा डिंग आणि भारताचा गुकेश यांच्यात चुरशीची लढत रंगली. सामन्याच्या शेवटच्या फेरीत डिंगने एक चूक केली अन् तिथेच गुकेशने संधी साधत सामना आपल्या नावावर केला. गुकेशने चिनी ग्रँडमास्टरचा पराभव करत 7.5 - 6.5 अशा फरकाने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, विश्व चॅम्पियनशिपमध्ये पोहोचणारा गुकेश, विश्वनाथन आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय आणि जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या विजयाचे बक्षीस म्हणून गुकेशला 18 कोटी रुपयेही मिळणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन पीएम मोदींनी त्यांच्या X अकाउंटर डी गुकेशचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की, गुकेशच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. गुकेशने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी हे यश संपादन केले आणि सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला. हे ऐतिहासिक आणि अनुकरणीय आहे. गुकेशच्या विजयाने केवळ बुद्धिबळाच्या इतिहासातच नाव नोंदवले नाही, तर लाखो तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा दिली आहे.

संपूर्ण भारताची मान उंचावली- राहुल गांधीकाँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेशचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, गुकेश, तू संपूर्ण भारताची मान उंचावली आहेस. वयाच्या 18 व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनणे ही अभूतपूर्व कामगिरी आहे. तुझी जिद्द आणि मेहनत आठवण करुन देते की, जिद्दीने काहीही शक्य आहे. अभिनंदन, चॅम्पियन! 

टॅग्स :Chessबुद्धीबळNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी