टाइट रायडर्सचे शानदार विजेतेपद

By Admin | Updated: July 4, 2016 21:38 IST2016-07-04T21:38:13+5:302016-07-04T21:38:13+5:30

शेवटच्या मिनिटात सुमीत नाखवाने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर ठाण्याच्या टाईट रायडर्स संघाने कल्याणच्या युवक क्रीडा मंडळाचा १-० असा पराभव करत

Great Riders title | टाइट रायडर्सचे शानदार विजेतेपद

टाइट रायडर्सचे शानदार विजेतेपद

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ : शेवटच्या मिनिटात सुमीत नाखवाने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर ठाण्याच्या टाईट रायडर्स संघाने कल्याणच्या युवक क्रीडा मंडळाचा १-० असा पराभव करत पावसाळी फुटबॉल स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. ठाणे येथील श्री आनंद भारती समाजाने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत तुफान फॉर्मात असलेल्या रायडर्स संघाच्या सुमीत नाखवाला ह्यउत्कृष्ट फुटबॉलपटूह्ण पुरस्काराने गौरविण्यात आले.
ठाणे पूर्वेकडील धर्मवीर क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग नोंदवला. अंतिम सामन्यात टाइट रायडर्सने युवक क्रीडा मंडळाविरुद्ध सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेतला. मध्यांतरापर्यंत सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला. यानंतर मात्र दोन्ही संघाच्या खेळात आक्रमकता दिसून आली. मात्र तरीही, दोन्ही संघांच्या बचावफळीने शानदार कामगिरी करताना प्रतिस्पर्धी आक्रमण रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
सामना अर्निणीत राहणार असे दिसत असतानाच, शेवटच्या मिनिटाला सुमीत नाखवाने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवत अप्रतिम गोल केला. सुमीतच्या या निर्णायक गोलच्या जोरावर टाईट रायडर्सने १-० अशा फरकाने जेतेपदावर नाव कोरले. (क्रीडा प्रतिनिधी)
....................................

Web Title: Great Riders title