शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पेनेटाचा ग्रॅण्ड सलाम

By admin | Updated: September 14, 2015 00:35 IST

इटलीच्या फ्लाविया पेनेटाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मायदेशातील सहकारी रोबर्टा विंचीचा ७-६, ६-२ ने पराभव केला

न्यूयॉर्क : इटलीच्या फ्लाविया पेनेटाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत मायदेशातील सहकारी रोबर्टा विंचीचा ७-६, ६-२ ने पराभव केला आणि कारकीर्दीत एकेरीमध्ये प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावताना व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. ३३ वर्षीय पेनेटाने ९३ मिनिटांमध्ये विजय मिळवला आणि ओपन युगात एकेरीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम महिला चॅम्पियन ठरणारी सर्वांत प्रौढ खेळाडू ठरली. पेनेटा म्हणाली, ‘माझे स्वप्न साकार झाल्यामुळे आनंद झाला.’ जेतेपदाचा चषक स्वीकारल्यानंतर काही वेळातच पेनेटाने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मला अशाच प्रकारची निवृत्ती अपेक्षित होती. मी खूश आहे. यापूर्वी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावणारी इटलीची एकमेव टेनिसपटू फ्रान्सिस्का शियावोन होती. शियावोनने २०१० मध्ये फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत प्रथमच जेतेपद पटकावले होते. त्यावेळी २९ वर्षीय शियावोन जेतेपद पटकावणारी सर्वाधिक वय असलेली खेळाडू ठरली होती. ओपन युगात प्रथमच आॅल इटली महिला ग्रॅण्डस्लॅम फायनल बघण्यासाठी आर्थर ऐश स्टेडियममध्ये २३,७७१ प्रेक्षंकासह इटलीचे पंतप्रधान मातेयों रेंजी उपस्थित होते. या विजयासह पेनेटा ३३ लाख डॉलर पुरस्कार रकमेची मानकरी ठरली, तर उपविजेती रोबर्टाला १६ लाख डॉलर्स रकमेवर समाधान मानावे लागले. पेनेटाने यापूर्वी यंदा पुरस्कार म्हणून एकूण केवळ ७,१२,३०१ डॉलर्सची रक्कम जिंकली होती, तर रोबर्टाची २०१५ ची पुरस्कार राशी ४,२२,१५८ डॉलर्स होती. पेनेटाने ४९ व्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत प्रथमच जेतेपदाचा मान मिळवला. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचा विचार करता पेनेटाला सर्वाधिक स्पर्धा खेळाव्या लागल्या. फ्रान्सच्या मारिन बार्तोलीच्या तुलनेत पेनेटाने दोन स्पर्धा अधिक खेळल्या. बार्तोलीने २०१३ मध्ये विम्बल्डनमध्ये जेतेपद पटकावले होते.