इंचियोन : भारताच्या ललिता बाबरला रौप्य व सुधा सिंग हिला कांस्यपदक मिळण्याचा आनंद २४ तासही टिकला नाही. बहरीनची युवा धावपटू रुथ जेबेटकडून इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेस स्पर्धेचे काढून घेण्यात आलेले सुवर्णपदक पुन्हा बहाल करण्यात आले. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील रौप्यपदक काढून घेण्यात आले. जेबेटने नवा स्पर्धा विक्रम नोंदविताना सुवर्णपदक पटकाविले होते, पण शर्यतीदरम्यान लेन बदलण्याच्या नियमामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले होते. ट्रॅक पंचांच्या ही बाब निदर्शनास आल्याने पदक प्रदान करण्यापूर्वीच तिला अपात्र ठरविण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्यामुळे रौप्यपदक विजेत्या चीनच्या झेन झुली हिला सुवर्ण, कांस्यपदकाची मानकरी ठरलेली सातारची ललिता बाबर हिला रौप्यपदक, तर चौथ्या स्थानावरील सुधा सिंग हिला कांस्यपदकाचा मान मिळाला. पण, या घटनेनंतर २४ तासांनी प्रकरणाची तपासणी करण्यात आल्यानंतर जेबेटला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. भारतीय अधिकारी या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता आहे.
बहारिनच्या रुथला सुवर्ण बहाल
By admin | Updated: September 29, 2014 06:38 IST