शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाच्या अखेरच्या दिवशी चिमुकल्यानं दिलं गोव्याला मोठं गिफ्ट; लियोन मेंडोंसा बनला गोव्याचा दुसरा ग्रॅण्डमास्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:51 IST

लियोनची कहाणी फार प्रेरणादायी आहे. गेल्या १८ मार्चपासून लियोन आणि त्याचे आर्इ,वडिल कोरोनामुळे युरोपमध्येच अडकले होते. त्यांच्यापुढे मोठे संकट ठाकले होतं. भारतात परतण्याचे मार्ग बंद होते. कारण येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती . त्यामुळे त्यांनी युरोपमध्ये थांबणे पसंत केले.

सचिन कोरडे(पणजी)

कोरोनामुळे सगळं क्रीडा क्षेत्र हादरलं. सगळीकडे नकारात्मक वातावरण पसरत असताना सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी गोव्याला गोड बातमी मिळाली. बुद्धिबळातील सर्वोच्च असलेला ‘ग्रॅण्डमास्टर’ हा किताब अवघ्या १४ वर्षीय मुलाने मिळवला. लियोन मेंडोंसा ( Leon Mendonca ) हे त्याचे नाव. त्याच्या रुपात गोव्याला आता दुसरा ग्रॅण्डमास्टर मिळालाय. अनुराग म्हामल हा गोव्याचा पहिला ग्रॅण्डमास्टर आहे.

लियोनची कहाणी फार प्रेरणादायी आहे. गेल्या १८ मार्चपासून लियोन आणि त्याचे आर्इ,वडिल कोरोनामुळे युरोपमध्येच अडकले होते. त्यांच्यापुढे मोठे संकट ठाकले होतं. भारतात परतण्याचे मार्ग बंद होते. कारण येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती . त्यामुळे त्यांनी युरोपमध्ये थांबणे पसंत केले. संघर्ष आणि कठिण वेळेतूनही यशाचा मार्ग साधता येतो असा सकारात्मक विचार त्यांनी केला. त्यामुळेच लियोनला त्यांनी विविध ऑनलाइन स्पर्धेत खेळविले. त्यानेही स्पर्धा गाजवल्या.

लियोन हा बुद्धिबळातील कुशाग्र खेळाडू आहे. हे त्याने यापूर्वीच दाखवून दिलं. गेल्या ९ महिन्यांत लियोनने १६ स्पर्धा खेळल्या. २४५२ अशा रेटींगपासून त्याने २५४४ या रेटींगपर्यंत मजल मारली. लियोनने पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म १६ ते २४ आक्टोबर दरम्यान झालेल्या चेस जीएमआर स्पर्धेत मिळवला. त्यानंतर बुदापेस्ट (७ ते १७ आक्टो) आणि इटलीत २६ ते ३० डिसेंबर दरम्यान व्हर्गिनी चषकात मिळवला. कोरोनाकाळातही बुद्धिबळाचा पट गाजवणाऱ्या या लहानशा खेळाडूवर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अखिल भारतीय बुद्धबळ संघटनेचे खजिनदार आणि गोवा बुदधबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर लियोनच्या कामगिरीबाबत म्हणाले की, वर्षाचा शेवट खूप गोड झाला. लियोनच्या रुपात बुदिबळातील उगवता तारा या देशाला मिळाला आहे. एवढ्या कमी वयात उत्तुंग भरारी मारली. संपूर्ण गोव्याला  लियोनवर गर्व आहे.  तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे संजय बेलूरकर यांनी लियोनला आम्ही सुरुवातीपासून खेळताना पाहात आलो आहे. तो नक्की कमाल करेल, असे वाटत होते मात्र त्याने तर खूप कमी वयात ग्रण्डमास्टर किताब मिळवला. त्याचे खूप अभिनंदन. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ