शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ज्युदोत ऑलिम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय - तन्वीन तांबोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 21:18 IST

तन्वीन हिने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया महोत्सवातील ज्युदोत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

पुणे : ज्युदोसारख्या खेळात करिअर करण्यास सुरुवात केल्यानंतर आमच्या समाजातील काही लोकांना आश्चर्य वाटले, थोडासा विरोधही झाला. मात्र आता विविध स्पर्धांमध्ये पदक मिळविल्यानंतर माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतो. ऑलिपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे, असे महाराष्ट्राची ज्युदोपटू तन्वीन तांबोळी हिने सांगितले.तन्वीन हिने पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया महोत्सवातील ज्युदोत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. २१ वर्षाखालील वयोगटात तिने ७० किलोखालील विभागात हे यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. तन्वीन ही मूळची विटा येथील खेळाडू आहे. तिची आई जस्मीन शिक्षिका असून वडील रफीक हे विटा नगरपालिकेत नोकरी करतात.ज्युदो करिअरविषयी तन्वीन म्हणाली, २०१२ मध्ये पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतर्फे घेण्यात आलेल्या शारीरिक कसोटी चाचणीद्वारे माझी निवड झाली. सुरुवातीला मी विविध खेळांचा सराव करीत असे. माझी तंदुरुस्ती व क्षमता पाहून ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू राजीव देव यांनी मला ज्युदोवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला योग्य मानून मी ज्युदोचा सराव सुरू केला. मधुश्री काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली माझा नियमित सराव सुरू आहे. खेलो इंडिया महोत्सवात अंतिम फेरी गाठल्यानंतर माझ्यावर थोडेसे दडपण होते. तथापि काशिद मॅडमनी मला संयमाने व आत्मविश्वासाने खेळण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी खेळले व सोनेरी कामगिरीचे स्वप्न साकार करू शकले.माझ्या ज्युदो करिअरसाठी मला आईवडिलांचे सतत प्रोत्साहन मिळत असते. मी दररोज येथील अकादमीत सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास सराव करते. खेळाची कारकीर्द सुरू असतानाच मी एकीकडे जोग महाविद्याालयात द्वितीय वर्ष कॉमर्समध्ये शिकत आहे. तेथे मला सतत चांगले सहकार्य मिळत असते. माज्या यशाचे त्यांच्याकडून कौतुकही होत असते. यंदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आहे. त्यासाठी लवकरच राष्ट्रीय निवड चाचणी शिबिर होणार आहे. या चाचणीत सर्वोच्च कामगिरी करीत आशियाई स्पर्धेत देशाकडून खेळण्यासाठी मी उत्सुक झाले आहे, असेही तन्वीन हिने सांगितले.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया