शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

जायंट किलर पुणे विरुद्ध बलाढ्य मुंबई

By admin | Published: May 21, 2017 12:50 AM

पुणे सुपरजायंट्सला या स्पर्धेत खऱ्या अर्थाने जायंट् किलरच म्हणावे लागेल. आयपीएलच्या नवव्या सत्रात हा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र नवा कर्णधार स्टिव्ह स्मिथ

- आकाश नेवे/ आॅनलाइन लोकमतपुणे सुपरजायंट्सला या स्पर्धेत खऱ्या अर्थाने जायंट् किलरच म्हणावे लागेल. आयपीएलच्या नवव्या सत्रात हा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र नवा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अनुभवी महेंद्र सिंह धोनी यांच्या नेतृत्त्वात पुणे संघाने भल्याभल्यांची दांडी गुल करत अंतिम फेरी गाठली. त्यांचा सामना आयपीएलमधील एक बलाढ्य संघ मुंबई इंडियन्ससोबत आहे. या सत्रात मुंबई विरुद्ध पुणे असे तीन सामने झाले. तिन्ही सामने पुणे सुपरजायंट्सने जिंकले आहेत.आता अंतिम फेरीत पुन्हा याच संघांची गाठ पडली आहे.आयपीएल १० च्या ग्रॅण्ड फायनलची सुरूवात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअमवर होत आहे. मुंबई इंडियन्सचा या सत्रातील पहिला सामना पुणे सुपरजायंट्ससोबत होता. मात्र पुण्याच्या तुफानी आक्रमणापुढे मुंबईला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पुणे संघाची अवस्था बिकट झाली. सलगच्या पराभवांमुळे स्पर्धेचे हे दुसरे सत्र देखील पुण्यासाठी चांगले जाणार नाही, असे बोलले जात होते. मात्र कर्णधार स्मिथने संघाला नवी प्रेरणा दिली. आणि पुणे संघ स्पर्धेतील जायंट किलर ठरला. साखळी फेरीत गुणतक्क्यात दुसरे स्थान आणि थेट अंतिम फेरीत दिलेली धडक ही पुण्यासाठी चांगली बाब ठरली. पुण्याचा सामना आता पुन्हा मुंबई इंडियन्ससोबतच आहे. त्यामुळे पुणे संघाला विजयाची अपेक्षा असेल. तर मुंबईचा संघ या स्पर्धेतील पुणे संघाविरोधातील ते तीन पराभव विसरुन आता पुन्हा एकदा आवेशात चढाई करायला तयार झाला आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणे याची बॅट मुंबई इंडियन्स विरोधात नेहमीच तळपली आहे. त्याने या सत्रात ३३८ धावा केल्या आहेत.तर मुंबई विरोधात ६०,३८ आणि ५६ धावांची खेळी केली आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथ, महेंद्र सिंह धोनी हे देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र मुंबईची खरी मदार अवलंबून आहे ती युवा राहूल त्रिपाठी, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, मनोज तिवारी, शार्दुल ठाकूर यांच्यावर. या युवा खेळाडूंनीच पुण्याला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत जयदेव उनाडकट २२ बळी घेत दुसऱ्या स्थानावर आहे. डावातील अखेरचे षटक हॅट्ट्रिक घेत निर्धाव टाकण्याचा विक्रम त्याने केला आहे. तर शार्दुलने देखील मुंबई विरोधात तीन बळी घेतले होते. वॉश्ािंगटनच्या सुंदर कामगिरीनेच पुण्याला थेट अंतिम फेरी गाठता आली. सलामीवीर राहूल त्रिपाठी याने सत्रात ३८८ धावा केल्या आहेत. त्याला पुण्याने त्याची बेसप्राईज १० लाख रुपयांत विकत घेतले होते. मात्र या सत्रात दमदार कामगिरी करत त्याने सगळ््यांचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतले आहे. अष्टपैलु बेन स्टोक्स आणि फिरकीपटू इम्रान ताहीर हे मायदेशी परतल्याने पुणे संघावर त्याचा परिणाम झाला आहे. या दोघांमुळे पुणे संघ संतुलीत भासत होता. मुंबई इंडियन्सचा संघ हा स्पर्धेतील सर्वात संतुलीत संघ मानला जातो. सत्राच्या सुरूवातीला पार्थिव पटेलच्या सोबतीला जोश बटलर हा सलामीला येत होता. या दोघांनी अनेकवेळा संघाला चांगली सुरूवात करून दिली. पार्थिव पटेल याने या स्पर्धेत ३९१ धावा केल्या आहेत. मात्र बटलर मायदेशी परतल्याने लेंडल सिमन्सने त्याची जागा घेतली. बाद फेरीच्या दोन्ही सामन्यात सिमन्सला फारशी चमक दाखवता आलेली नाही. मुंबईला पुण्याविरोधात विजयासाठी सलामीच्या जोडीने पॉवरप्लेमध्ये दमदार कामगिरी करायला हवी. रायडूू देखील बाद फेरीच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरल्याने नितीश राणाला संधी मिळू शकते. राणा हा या स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याने सत्रात ३३३ धावा काढल्या आहेत. त्यासोबतच रोहित शर्मा आणि किरेन पोलार्ड हे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद बाळगतात, मात्र दिवस त्यांचा असेल तरच.मुंबईची गोलंदाजी आयपीएलमधील सर्वात मजबूत गोलंदाजी मानली जाते. मिशेल मॅक्लेघन, जसप्रीत बुमराह हे टॉप ५ मध्ये असलेले गोलंदाज आहे. सुपर ओव्हरमध्ये ११ धावांचे आव्हान असताना देखील फिंच, मॅक्क्युलम सारख्या फलंदाजांना बुमराहनेच फटकेबाजीपासून रोखले होते. त्याच्यासोबत मलिंगा देखील डेथ ओव्हर्समध्ये धावांवर अकुंश राखु शकतो. मिशेल जॉन्सननेही संधी मिळताच आपला दम दाखवला आहे. मुंबईने या आधी तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी मुंबईला चेन्नई सुपर किंग्जचाच सामना करावा लागला होता. मुंबईने २०१० मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना सीएसकेकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर २०१३ आणि २०१५ मध्ये मुंबईने सीएसकेला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. मुंबईने विजेतेपद पटकावले तेव्हा दोन्ही वेळेस संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता. तर सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी होता. यंदाच्या अंतिम फेरीतही मुंबईचा कर्णधार रोहितच आहे. तर पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ असला तरी धोनीने नेहमीच रणनिती बनवणे आणि योजना अंमलात आणण्यात आपली छाप सोडली आहे.