शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धांचा अधिक अनुभव घ्या

By admin | Updated: July 1, 2017 02:11 IST

अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेतल्याशिवाय चांगली कामगिरी करण्यासाठी टीप्स मिळणार नाहीत.

नवी दिल्ली : अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेतल्याशिवाय चांगली कामगिरी करण्यासाठी टीप्स मिळणार नाहीत. नियमितपणे अशा स्पर्धा खेळणार नसाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण वरचे स्थान गाठूच शकणार नाही. जागतिक स्तरावर यश मिळविण्यासाठी अधिक अनुभव घ्यावा लागेल, असा सल्ला लांब उडीतील माजी दिग्गज अंजू बॉबी जॉर्ज हिने दिला आहे.२००३ च्या विश्व अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत कांस्य पदक विजेती एकमेव भारतीय खेळाडू अंजू म्हणाली, ‘अनेक भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आव्हान देण्याऐवजी सराव करण्यावर भर देतात. असे न करता यापुढे अमेरिका ंिकंवा युरोपातील खेळाडूंप्रमाणे अव्वल दर्जाच्या भारतीय खेळाडूंनी आपले मॅनेजर ठेवून व्यावसायिकता स्वीकारायला हवी.’आमच्या वेळेच्या तुलनेत सध्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. तथापि खेळाडू आधीच्या जुन्याच पद्धतीचा अवलंब करीत केवळ सरावावर भर देतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना पाठविले जात नाही. सरावातून ५० टक्के तयारी होते पण उरलेली तयारी ही स्पर्धात्मक वातावरणावर अवलंबून असते. ग्रॅण्डप्रिक्स किंवा डायमंड लीगसारख्या स्पर्धांमधील अनुभव भारतीय खेळाडूंना मिळायला हवा, असे मत अंजूने व्यक्त केले.जागतिक स्तरावर यश मिळविण्यासाठी भारतीय खेळाडूंनी नेमके काय करायला हवे, हे समजावून सांगताना अंजू म्हणाली, ‘आम्ही कठोर मेहनत करण्यावर भर देतो. या बळावर विश्व स्पर्धा किंवा आॅलिम्पिकसाठी चढाओढ करतो. हा योग्य मार्ग नाही. यामुळे आॅलिम्पिक अथवा विश्व स्पर्धांमध्ये तुम्ही पदक जिंकू शकत नाही. अमेरिकन किंवा युरोपियन खेळाडूंचा दृष्टिकोन वेगळाच आहे. अव्वल दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास पदकाचे अर्धे काम सोपे होते. मी स्वत: अमेरिका आणि युरोपातील स्पर्धांमध्ये वारंवार सहभागी झाल्याने त्या स्तरावर यशस्वी ठरू शकले.’जागितक स्तरावरील स्पर्धांमधील प्रतिनिधित्वासाठी आर्थिक मदत कोण करणार असा सवाल करताच ती म्हणाली, ‘आर्थिक सहकार्य करणे सरकारची जबाबदारी आहे. अ‍ॅथ्लीटस् मात्र व्यावसायिकपणे खेळले पाहिजेत. व्यावसायिक खेळाडू असाल तर कोच आणि मॅनेजर यांना सर्व प्रकारची माहिती असायला हवी. प्रवास, सराव, वेळापत्रक हे आधीच तयार करण्याची जबाबदारी सहयोगी स्टाफची असते. व्यावसायिकपणा आणण्याचे काम क्रीडा महासंघ करणार नाही. अमेरिका आणि युरोपातील अ‍ॅथ्लीटस् हे काम स्वत: करतात.’ अंजूने ज्युनियर स्तरावरील अ‍ॅथ्लीटस्ची फळी तयार करण्यावर भर दिला. यातूनच पुढे सिनियर स्तरावर चांगले खेळाडू पुढे येतील, असा विश्वास तिने व्यक्त केला. (वृत्तसंस्था)