शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीचा दुर्लक्षित खेळाडू ते ‘नॅशनल हीरो’

By admin | Updated: July 15, 2014 02:28 IST

मारियो गोत्झे! जर्मनीला २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटबॉल विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देणारा हीरो. ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू म्हणून मैदानात शिरलेला जगज्जेता

रियो दी जेनेरियो : मारियो गोत्झे! जर्मनीला २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा फुटबॉल विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देणारा हीरो. ८८ मिनिटांनंतर बदली खेळाडू म्हणून मैदानात शिरलेला जगज्जेता. आता तो नॅशनल हीरो बनला आहे.गोत्झेचा गेल्या वर्षभरातील प्रवास अत्यंत निराशादायी आणि वेदना देणारा होता. तो ज्या क्लबकडून खेळतो त्या बायर्न म्यूनिच संघातही वर्षभरात स्थान मिळवू शकला नव्हता. कुटुंबीय आणि प्रेयसीने मात्र त्याचा उत्साह टिकवून ठेवला आणि अखेर या उत्साहाला उधाण आले. २००९ साली त्याने १७व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमध्ये प्रवेश केला. पाच वर्षांत डॉर्टमन्ड आणि ब्रायर्न म्यूनिचसाठी १५० वर क्लब सामनेदेखील खेळले. गोत्झेने सोमवारच्या पहाटे अर्जेंटिनाविरुद्ध मारलेला विजयी गोल ३५ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ११वा गोल होता. मराकाना स्टेडियमवर काल आपल्या सहकाऱ्यांचा खेळ पाहत असताना त्याच्यातील युवा खेळाडू सारखा वळवळत होता. काहीतरी करून दाखविण्याची खुमखुमी होती. संधी मिळताच त्याचे टॅलेंट पुढे आले. जर्मनी विश्वविजेता बनला.मेम्मिजेंन येथे जन्मलेला गोत्झे आठव्या वर्षी डॉर्टमन्ड अकादमीत सहभागी झाला. त्याचे वडील तंत्रविज्ञान विद्यापीठात प्रोफेसर होते. चिमुकला गोत्झे आपला मोठा भाऊ फॅबिन आणि थोरला भाऊ फेलिक्स यांच्यासोबत फुटबॉल खेळायचा. गोत्झे सांगतो, ‘या खेळात लहानपणापासूनच मी दोन्ही पायांनी चेंडूचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करायचो. त्याला २१ नोव्हेंबर २००९ला संघ व्यवस्थापक जुर्गेन क्लोप यांनी बदली खेळाडू म्हणून संधी दिली. त्याआधी १७ नोव्हेंबर रोजी त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवेश झाला होता. स्वीडनविरुद्ध मैत्री सामन्यात जोकिम लो याने बदली खेळाडू म्हणूनच मैदानात पाठविले होते. देशाकडून खेळणारा सर्वांत युवा खेळाडू म्हणूनही त्याला ओळखले जाऊ लागले. याशिवाय जर्मनीच्या सिनियर संघातील सर्वांत युवा खेळाडूचा मानही त्यानेच पटकावला. क्लोस थकल्यामुळे गोत्झेला ट्रॉफी खेचून आणण्याची संधी मिळाली.