नवी दिल्ली : मुख्य कोचची निवड करताना पॅनलचा सदस्य म्हणून अनुपस्थितराहणारा सौरभ गांगुली हा बीसीसीआयपेक्षा मोठा नाही, अशी टीका करीत माजीकर्णधार बिशनसिंग बेदी यांनी राष्ट्रीय कोचच्या नियुक्ती वादात रवी शस्त्री याची बाजू घेतली.भारतीय संघाबाहेर असलेला गौतम गंभीर याने देखील एका वाहिनीशी बोलताना रवीशास्त्री यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तो म्हणाला, रवीशास्त्री यांच्या वक्तव्यात त्यांची निराशा झळकते. कुंबळे सर्वोत्कृष्टपसंती असून ती कठोर मेहनत घेणारी व्यक्ती आहे. माजी खेळाडू आणि सध्या समालोचक असलेला संजय मांजरेकर याने टिष्ट्वटरवर मत मांडताना कुंबळेला पाठिंबा दिला. तो म्हणाला, माझ्यामते रवी कोचपदासाठी निवड न झाल्याने हताश आहे. हा त्याच्यासाठी नवा अनुभव असेल कारण बीसीसीआयने कोचपदी उत्कृष्ट व्यक्तीची निवड केली आहे. (वृत्तसंस्था)
गांगुली बोर्डापेक्षा मोठा नाही, बेदी यांचा शास्त्रीला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 20:32 IST