शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

गंभीरच्या केकेआरला विराट चॅलेंज

By admin | Updated: April 23, 2017 19:53 IST

मागच्या सामन्यात गुजरात लायन्सने केकेआरच्या गोलंदाजीची काढलेली पिसे कर्णधार गौतम गंभीर विसरला नसेल. त्यासोबत रॉयल

 आकाश नेवे/ऑनलाइन लोकमतमागच्या सामन्यात गुजरात लायन्सने केकेआरच्या गोलंदाजीची काढलेली पिसे कर्णधार गौतम गंभीर विसरला नसेल. त्यासोबत रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची गेल्या सामन्यातील स्फोटक खेळीदेखील अप्रतिम होती. त्याचेच आव्हान केकेआर समोर आहे. बंगलुरूचा संघ सातव्या स्थानावर असला तरी दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरसमोर त्यांचे मोठे आव्हान आहे. आज ईडन गार्डनवर ८ वाजता हा सामना होणार आहे. बंगलुरूचा संघ हा त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठीच नावाजलेला आहे. सलामीवीर ख्रिस गेल, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स, ट्रॅव्हिस हेड, केदार जाधव अशी दमदार आणि कोणत्याही क्षणाला सामना पालटण्याची ताकद असलेल्या फलंदाजांची फौजच आरसीबीकडे आहे. गुजरात लायन्स विरोधातील सामन्यात त्याचा प्रत्यय आला. या सामन्यात गेलेला त्याचा हरवलेला सूर सापडला. त्यासोबतच दुखापतीतून पुनरागमन केलेल्या कोहलीनेही आपला दम दाखवून दिला. डिव्हिलियर्सच्या या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे, तर केदार जाधव हा छोटे पॅकेट मे बडा धमाका  म्हणून ओळखला. आपल्या तंत्रशुद्ध फटक्यांनी तो सामन्याचा मोहराच बदलून टाकतो. फलंदाजी दमदार असली, तरी आरसीबीसमोर गोलंदाजीचे मोठे आव्हान आहे. चहल सातत्याने चांगली कामगिरी करत असला, तरी त्याला इतर गोलंदाजांचीफारशी साथ मिळालेली नाही. मागच्या सामन्यात पवन नेगीने सुरुवात केली आणि यशही मिळवले. मात्र, तो बेभरवशाचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो.शेन वॉटसन सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे कर्णधार विराटनेदेखील  त्याच्यावर उघड टीका केली आहे. स्टुअर्ट बिन्नी, अ‍ॅडम मिल्ने आणि श्रीनाथ अरविंद हेदेखील अपयशी ठरले आहेत.ईडन्सवर होणाऱ्या सामन्यांसाठी केकेआरच सगळ््यांची पसंती आहे. केकेआरने आपल्या अनोख्या रणनीतीने सगळ््यांनाच चकित केले आहे. सुनील नारायणलासलामीला पाठवण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला आहे. तो पुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र रॉबिन उथप्पाला पुन्हा यष्टीरक्षणाची जबाबदारी देणे, केकेआरला परवडणारे नाही. मागच्या सामन्यात त्याने रैनाचा सोपा झेल सोडला होता, या जीवदानाचा फायदा घेत रैनाने मॅचविनिंग खेळी केली होती. शाकिब अल हसनने १०च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्याऐवजी ट्रेंटबोल्ट किंवा अन्य गोलंदाजाचा विचार करावा लागेल. गोलंदाजी अपयशी ठरली असली, तरी प्रशिक्षक जॅक कॅलिस यांनी आपल्या गोलंदाजांचा बचाव केला आहे. आयपीएलमध्ये या आधी केकेआर आणि आरसीबी यांच्यात १८ सामने झाले आहेत. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी ९ सामने जिंकले आहेत, तर चॅम्पियन्स लीग टी-२० झालेल्या सामन्यात केकेआरने विजय मिळवला आहे.