शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Neeraj Chopra: डायमंड लीगसाठी पूर्णपणे सज्ज - नीरज चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 08:29 IST

Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने शनिवारी फिनलँड येथील क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत ८६.६९ मीटर भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी झालेल्या पाव्हो नुमी क्रीडा स्पर्धेतही त्याने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक आपल्या नावे केले होते.

नवी दिल्ली : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने शनिवारी फिनलँड येथील क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत ८६.६९ मीटर भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी झालेल्या पाव्हो नुमी क्रीडा स्पर्धेतही त्याने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक आपल्या नावे केले होते. त्यामुळे दुखापतीच्या शंकांना दूर करत आपण आगामी डायमंड लीगसाठी पूर्णपणे तयार असल्याचे नीरज चोप्राने म्हटले आहे.क्योर्टाने स्पर्धेदरम्यान तिसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्रा ट्रॅकवर घसरला होता. पावसामुळे भालाफेकपटूंसाठी प्रतिकूल परिस्थिती तयार झाली असल्याने ओल्या ट्रॅकचा फटका नीरजला धावताना बसला आणि तो घसरला. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्याने यातून तो लवकर सावरत मैदानावर आला. या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८६.६९ मीटर भाला फेकला. अखेरपर्यंत एकही भालाफेकपटू याच्या आसपासही येऊ न शकल्याने नीरजला सुवर्णपदकाचा मान मिळाला. आपल्या या पराक्रमाबद्दल बोलताना नीरज म्हणाला, खराब हवामानामुळे आमच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती तयार झाली होती. मात्र त्यावर मात करत अव्वल कामगिरी करता आल्याने मी खूश आहे. आता ३० जूनला होणाऱ्या डायमंड लीगसाठी मी सरावाला जोमात सुरुवात करणार आहे. क्टोर्टाने स्पर्धेत नीरजला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीला भलेही मागे टाकता आले नसलेही मात्र सुवर्णपदकासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली.

भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे स्पष्टीकरणनीरज चोप्राच्या दुखापतीबाबत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (एएफआय) स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, 'क्योर्टाने स्पर्धेत भालाफेकीच्या तिसऱ्या प्रयत्नात नीरज घसरला होता. पण तो सध्या पूर्णपणे तंदुरुस्त असून घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. नीरजा पुन्हा एका सुवर्ण कामगिरीसाठी आमच्या शुभेच्छा.'

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा