शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

गतविजेत्या मुंबईकरांसमोर तामिळनाडूचा ८७ धावांत खुर्दा

By admin | Updated: October 7, 2016 06:15 IST

अनुभवी धवल कुलकर्णी आणि रणजी पदार्पण करणारा तुषार देशपांडे या मध्यमगती गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी स्पर्धेच्या आपल्या

रोहतक : अनुभवी धवल कुलकर्णी आणि रणजी पदार्पण करणारा तुषार देशपांडे या मध्यमगती गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी स्पर्धेच्या आपल्या पहिल्या सामन्यात पहिल्याच दिवशी तामिळनाडूला अवघ्या ८७ धावांत गुंडाळले. यानंतर मुंबईची सुरुवातही निराशाजनक झाली. पहिल्या दिवसअखेर मुंबईने ४ बाद ८५ अशी मजल मारली. कर्णधार आदित्य तरे २२ तर कौस्तुभ पवार २६ धावांवर नाबाद आहेत.नाणेफेक जिंकून तरेने गोलंदाजी स्वीकारली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीचा धवल-तुषार जोडीने पुरेपूर फायदा घेत रणजी स्पर्धेत मुंबईला धमाकेदार सुरुवात करून दिली. तुषारने २५ धावा तर धवलने ३१ धावा देत प्रत्येकी ४ फलंदाजांना तंबूत धाडले. बलविंदर सिंग संधूने (२/१४) देखील या दोघांना चांगली साथ दिली. तामिळनाडूकडून बाबा इंद्रजीत (नाबाद २८), बाबा अपराजित (१६) आणि दिनेश कार्तिक (१५) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.यानंतर मुंबईने आक्रमक सुरुवात केली, मात्र त्याचा फायदा घेण्यात मुंबईकरांना अपयश आले. अश्विन क्रिस्टने सलामीवीर जय बिस्ताला (७) बाद करून मुंबईला पहिला झटका दिला. अखिल हेरवाडकर (१७), अरमान जाफर (०) व सूर्यकुमार यादव (३) लगेच परतल्याने मुंबईचा डाव ४ बाद ५३ असा घसरला. यानंतर कौस्तुभ पवार (नाबाद २६) व कर्णधार तरे (नाबाद २२) यांनी मुंबईला सावरले. (क्रीडा प्रतिनिधी)