शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिग्गज मेरीकोमसह चार भारतीय बॉक्सर्स उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 02:16 IST

पाचवेळची वर्ल्ड चॅम्पियन दिग्गज एम. सी. मेरीकोमसह (४८ किलो) भारताच्या चार बॉर्क्सर्सनी रविवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.

नवी दिल्ली : पाचवेळची वर्ल्ड चॅम्पियन दिग्गज एम. सी. मेरीकोमसह (४८ किलो) भारताच्या चार बॉर्क्सर्सनी रविवारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. परंतु दुसरीकडे एल. सरिता देवी (६० किलो) हिला मात्र पराभव स्वीकारावा लागला. मेरीकोमने कझाखस्तानच्या एसरिम कासेनायेव्हाचा ५-० ने पराभव केला. त्याचवेळी, युवा मनीषा मौनने स्पर्धेतील सर्वात लक्षवेधी विजय मिळवताना जागतिक विजेती डिना जोलामॅनला पराभवाचा धक्का देत खेळबळ माजवली.विश्व चॅम्पियनशिपमध्ये पाच सुवर्णांसह एकूण सहा पदके जिंकणाऱ्या मेरीकोमने रविवारी केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर कजाखस्तानच्या दिग्गज प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी मेरीकोमला मंगळवारी चीनच्या वु यूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. वु यूने फिलिपिन्सच्या जोसी गाबुकोचा पराभव केला.गेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये सरिताने येथे सुवर्णपदक पटकावले होते. ती पुन्हा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील होती, पण आयर्लंडची २०१६ च्या विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती एने कॅली हॅरिंग्टनविरुद्ध तिला २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यात रेफरीने सरिता पडल्यानंतर काऊंटिंग सुरू केली होती. सरिता निकालावर नाराज होती.याव्यतिरिक्त भारताची युवा बॉक्सर मनिषा मोन (५४ किलो), लवलिना बोरगोहेन (६९ किलो) आणि भाग्यवती काचरी (८१ किलो) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताचे आठ खेळाडू आतापर्यंत रिंगमध्ये उतरले असून सरिता देवीचा अपवाद वगळता सर्वांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.दुपारच्या सत्रात युवा मनीषाने विद्यमान विश्व चॅम्पियन कजाखस्तानच्या डिना जोलामॅनचा ५-० ने पराभव केला. यापूर्वीच्या फेरीत अमेरिकेच्या अनुभवी क्रिस्टिना क्रूजचा पराभव करणाºया मनीषाने यापूर्वी पोलंडमध्ये डिनाचा पराभव केलेला होता. आता पदकाच्या शर्यतीत येण्यासाठी मनीषाला मंगळवारी अव्वल मानांकित व २०१६ च्या विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती स्टोयका पेट्रोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.मनीषाने आपल्या उंचीचा लाभ घेतला. तिने प्रतिस्पर्ध्यापासून अंतर राखून खेळताना डाव्या व उजव्या हाताने पंच लगावण्याची रणनीती कायम राखली. पाच परीक्षकांनी मनीषाला ३०-२७, २०-२७, २०-२७, २९-२८, २९-२८ असे गुण दिले.दिवसाच्या दुसºया लढतीत लवलिनाने पनामाच्या अथेयना बाईलोनचा ५-० ने पराभव केला. या लढतीत उभय खेळाडूंनी एकमेकींना अनेकदा खाली पाडले. लवलिनाला पाचही जजेसने ३०-२७ असे समान गुण बहाल केले. लवलिनाला मंगळवारी आॅस्ट्रेलियाचा काये फ्रान्सेस स्कॉटच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्कॉटने अन्य लढतीत कजाखस्तानच्या अकरके बखितजानचा ५-० ने पराभव केला. भाग्यवतीने लाईट हेविवेट गटात पहिल्या फेरीत जर्मनीच्या इरिना श्कोनबर्गरचा ४-१ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)उंचीचा फटकाभारतीय महिला संघाचे प्रशिक्षक इटलीचे रफाएल बर्गामास्को म्हणाले, ‘भाग्यवतीची उंची थोडी कमी असून तिच्या पायाची हालचाल थोडी संथ आहे. अनुभवानंतर त्यात नक्कीत सुधारणा होईल. ती काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाली. बदल करण्यासाठी थोडा कालावधी अपेक्षित आहे. युवा खेळाडू बदल लवकर आत्मसात करतात.’‘पहिल्या फेरीतील अडथळा पार केल्याचा आनंद आहे. यावेळी माझ्यवर दबाव होता, पण असे दबाव मी याआधीही अनेकदा यशस्वीपणे पार केले आहेत,’ असे मेरीकोम म्हणाली.

टॅग्स :boxingबॉक्सिंग