शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: खेळाडूंवर चाकू हल्ला, जळते फटाकेही फेकले; LIVE सामन्यात प्रेक्षकांचा धुडगूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:23 IST

खेळ हा विषय अनेकांच्या जवळचा आहे. पण, कधी-कधी हा खेळ हिंसक वळण घेऊ शकतो.

Rampage in Football Match : खेळ हा विषय अनेकांच्या अगदी जवळचा आहे. मग तो क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा अजून कोणता खेळ असो. खेळामधील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागतात. यापूर्वी अनेकदा चालू सामन्यात चाहते हिंसक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे. या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

Bursaspor vs Amedspor या संघातील खेळाडू सामन्यापूर्वी वॉर्मअप करत असताना Amedspor च्या खेळाडूंवर चाकू, जळते फटाके आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. हा हल्ला Bursaspor च्या चाहत्यांनी केला होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर संपूर्ण सामन्यादरम्यान प्रेक्षक कुर्दीशविरोधी गाणीही गात होते.

सामना सुरू होईपर्यंत हल्ले सरावाच्या वेळी खेळाडूंवरील चाहत्यांचा रोष सामन्यादरम्यानही कायम होता. हा खेळ 90 मिनिटे चालला आणि यादरम्यान चाहत्यांचा राग खेळाडूंवर दिसत होता. ते त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकताना दिसले. सामन्याची अंतिम शिट्टी वाजल्यानंतरही हा तमाशा सुरुच होता. चाहत्यांनी खेळाडूंवर फेकलेला चाकूही मैदानातून सापडल्याचे चित्र समोर आले. अॅमेडस्पोरच्या टीमने या संपूर्ण घटनेची तक्रार केली. ड्रेसिंग रुममध्ये खाजगी सुरक्षा पर्यवेक्षक, क्लब सुरक्षा अधिकारी, क्लब कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांच्याकडूनही त्यांचा छळ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

तुर्की फुटबॉल महासंघाने मौन बाळगले अद्याप या संपूर्ण प्रकरणावर तुर्की फुटबॉल महासंघाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, Amedspor गेल्या काही वर्षांपासून तुर्कीमध्ये वादात सापडले आहे. याचे कारण त्यांचे बदललेले नाव आहे. हे नाव कुर्दिश शहर अमेदवर आधारित आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी