शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

फुटबॉल : महाराष्ट्राचा लक्षद्वीपवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 8:53 PM

पश्चिम विभाग संतोष चषक पात्रता फेरी : सलग दुसरा विजय 

पणजी : महाराष्ट्र संघाने लक्षद्वीप संघाचा ३-० ने पराभव केला. याबरोबरच त्यांनी संतोष चषक स्पर्धेसाठी आयोजित पश्चिम विभागीय पात्रता फेरीतील स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. हा सामना धुळेर-म्हापसा मैदानावर खेळविण्यात आला. महाराष्ट्राकडून यश म्हात्रे (११ व्या), अ‍ॅलन डायस (५३) आणि शेनॉन परेरा (८२) यांनी गोल नोंदवला. लक्षद्वीपकडून एकही गोल नोंदवण्यात आला नाही.आजच्या सामन्यासाठी महाराष्ट्र संघाने संघात काही बदल केले होते. अद्वैत शिंदे आणि प्रग्नेश सोळंकी यांनी सुरुवात केली. अमन गायकवाडला विश्रांती देण्यात आली. दमण आणि दीव संघावर एकमेव गोलने विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र संघाने आज गोल नोंदवण्यासाठी वेळ घालवला नाही. ११ व्या मिनिटालच महाराष्ट्राने आघाडी घेतली. यशने हेडरद्वारे हा गोल नोंदवला. मध्यंतरात महाराष्ट्र एका गोलने आघाडीवर होता. दुसºया सत्रात, महाराष्ट्र संघाने ५३ व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. निखिल प्रभू याने लांबवरून चेंडू अ‍ॅलनकडे सोपविला यावर त्याने कोणतीही चूक न करता गोलसंधी साधली. त्यानंतर ८२ व्या मिनिटाला शेनॉन परेरा याने संघाचा तिसरा गोल नोंदवला. चौथा गोल नोंदवण्याची संधी प्रग्नेशला मिळाली होती, मात्र सहा यार्डवरून मारलेला त्याचा फटका हुकला. संघाच्या विजयानंतर महाराष्ट्राचे साहाय्यक प्रशिक्षक परेश शिवोलकर म्हणाले की, आम्ही खेळात बरीच सुधारणा केली आहे. आक्रमकता वाढल्याने मी समाधानी आहे. संघाला बºयाच संधी मिळाल्या, मी खेळाडूंवर खुश आहे. आजचे सामने : राजस्थान वि. दादर अ‍ॅण्ड नगर हवेली (सकाळी ८ वा.), मध्य प्रदेश वि. गोवा (दुपारी ३.३० वा.) दोन्ही सामने : धुळेर मैदानावर.

टॅग्स :Footballफुटबॉलgoaगोवा