शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

World Athletics Championships: भारतीय खेळाडूंचा डंका! नीरज चोप्रा पाठोपाठ रोहित यादवनेही गाठली अंतिम फेरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 10:54 IST

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा विजयी डंका अद्याप सुरूच आहे.

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा (Neeraj Chopra) विजयी डंका अद्याप सुरूच आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा नीरजने मैदान गाजवलं आहे. याशिवाय ट्रिपल जंपमध्ये भारताच्या एलडहोस पॉलने (Eldhose Paul 16.68M) इतिहास रचून सर्वांचे लक्ष वेधले असून तो तिहेरी उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. नीरज चोप्राशिवाय आणखी एक भारतीय खेळाडू रोहित यादवने देखील ८०.४२ मीटर भाला फेकून फायनलचे तिकिट मिळवलं आहे. 

१९ वर्षांचा संपणार दुष्काळ? दरम्यान, पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमनेही फायनलसाठी क्वालिफाय केले आहे. दोन भारतीय खेळाडू जागतिक थलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुष भालाफेकच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वच भारतीयांना नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा असणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारा नीरज चोप्रा आणखी एक सुवर्ण पदक पटकावणार का हे पाहण्याजोगं असेल. रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा १९ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी नीरज चोप्राकडे असणार आहे. 

एकाच 'थ्रो'ने दिलं फायनलचं तिकिटफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ८३.५० मीटरची पात्रता ठेवण्यात आली होती. नीरज ग्रुपचा हिस्सा होता आणि सर्वप्रथम तो थ्रो करण्यासाठी आला. विशेष म्हणजे आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्याने ८८.३९ मीटर लांबीवर भाला फेकून फायनलमध्ये प्रवेश केला. हा त्याचा या वर्षातील तिसरा सर्वश्रेष्ठ थ्रो आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणखी एक विश्वविक्रम करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. आपल्या पहिल्याच थ्रोमध्ये क्वालिफाय करणाऱ्या चोप्राने सहज अंतिम फेरी गाठली. 

एलडहोस पॉलने रचला इतिहासनीरज चोप्राच्या आर्मीमध्ये आणखी एका भारताचा खेळाडूचा समावेश झाला आहे. भारताचा स्टार ट्रिपल जंपर एलडहोस पॉलने देखील या चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय केले आहे. १६.६८ मीटरचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत त्याने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे त्याला १७.०५ ची पात्रता गाठण्यात अपयश आलं मात्र टॉप १२ मध्ये असल्यामुळे त्याला अंतिम फेरीत स्थान मिळाले. 

 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Indiaभारत