शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताची फ्लाईंग राणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 19:27 IST

फुटबॉल विश्वचषक आणि भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा या हायव्होल्टेज स्पर्धा सुरू असतानाही 19 वर्षीय हिमा दासने संपूर्ण देशवासियांचे लक्ष वेधले.

फुटबॉल विश्वचषक आणि भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा या हायव्होल्टेज स्पर्धा सुरू असतानाही 19 वर्षीय हिमा दासने संपूर्ण देशवासियांचे लक्ष वेधले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यामुळे तिला भारताची फ्लाईंग राणी म्हणून संबोधले जात आहे. भारताच्या हिमा दासने अॅथलेटीक्स स्पर्धेत इतिहास रचला आहे. जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत हिमाने सुवर्णपदक पटकावले आहे. 

हिमा दासने भारताला जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक अँड फिल्डमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. फिनलँड येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील मुला/मुलींसाठीच्या या स्पर्धेत हिमाने 400 मीटर स्पर्धेत बाजी मारून इतिहास घडवला.

रॅटिना स्टेडियमवर झालेल्या लढतीत हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून प्रतिस्पर्धी धावपटूंना मागे टाकले. यासह या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.  यापूर्वी 2016 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. पण ट्रॅक प्रकारात सुवर्ण जिंकणारी हिमा ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. 

जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत याआधी थाळीफेकपटू सीमा पूनिया (2002 मध्ये कांस्यपदक ) आणि थाळीफेकपटू नवजीत कौर ढिल्लोने ( 2014 मध्ये कांस्यपदक ) यांनी पदक जिंकले आहेत. 

हिमाच्या आधी मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केलेली होती. पीटी उषाने 1984च्या ऑलिम्पिक स्पर्धेत 400मीटर अडथळ्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानापर्यंत मुसंडी मारली होती. 

मिल्खा सिंहने 1960च्या ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. या दोघांव्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूला पदकाजवळ जाता आलेले नाही.  

टॅग्स :Sportsक्रीडा