शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारताची चढउतारांची वाटचाल

By admin | Updated: February 14, 2015 10:21 IST

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताची वाटचाल चढउतारांची आणि खाचखळग्यांची राहिली आहे.या वाटचालीचा हा आढावा....

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताची वाटचाल चढउतारांची आणि खाचखळग्यांची राहिली आहे. पहिल्या विश्वचषकात नवख्या असणा-या भारताने तिस-या स्पर्धेत विश्वचषक जिंकला. यानंतर जगज्जेते होण्यासाठी त्यांना २0११ साल उजाडावे लागले. या वाटचालीचा हा आढावा....१९७५ - आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय क्रिकेटची ओळख होऊन दीड वर्षेही लोटले नसताना विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पहिली स्पर्धा भरविण्याचा मान अर्थातच इंग्लंडला देण्यात आला. या स्पर्धेपूर्वी इंग्लंडने सर्वाधिक १५ वन-डे सामने खेळले होते. विशेष म्हणजे भारताने या स्पर्धेपूर्वी एकही वन-डे सामना खेळलेला नव्हता. श्रीनिवास वेंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला पहिल्या सामन्यात इंग्लंडने २0२ धावांनी हरविले. अक्षरश: कोरी पाटी घेऊन सहभागी झालेल्या भारताला या स्पर्धेत एकच सामना जिंकता आला. त्यांनी पूर्व आफ्रिका संघाला दहा विकेटस्नी हरविले. या एका विजयाची शिदोरी घेऊन भारत मायदेशी परताला.

 

१९७९ - भारताचा या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, श्रीलंकेसह ‘ब’ गटात समावेश होता. साखळी सामन्यातच भारताचे आव्हान संपले; पण त्याहून निराशाजनक म्हणजे या स्पर्धेत भारताला एकही विजय मिळविता आला नाही. अगदी त्याकाळी कसोटीचा दर्जा नसलेल्या श्रीलंकेनेही भारताला हरवले. श्रीलंकेचा हा वन-डेच्या इतिहासातील पहिला विजय ठरला.

 

१९८७ - १९८३ चा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या पहिल्याच घासाला खडा लागला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध झालेली ही थररारक लढत भारताने केवळ एका धावेने गमावली. या पराभवाने भारतीय संघ सावध झाला. बंगलोरच्या दुस-या लढतीत भारताने न्यूझीलंडला १६ धावांनी पराभूत केले. त्यापाठोपाठ झिम्बाब्वेवर ८ विकेटस्नी दणदणीत विजय मिळविला. आॅस्टे्रलियाविरुद्ध दुसऱ्या साखळी लढतीत मात्र भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि कांगारूंचा ५६ धावांनी पराभव करून पहिल्या पराभवाचा बदला घेतला. झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांना दुसऱ्या लढतीतही भारताने सहज हरविले. पहिला पराभव वगळता भारताने साखळी फेरीत दणदणीत कामगिरी केली व गटात अव्वल स्थान मिळवत आरामात उपांत्यफेरी पक्की गाठली. सेमिफायनलमध्ये भारताची गाठ मुंबईत इंग्लंडशी पडली. वानखेडेवर झालेल्या या लढतीत भारताचा ३४ धावांनी पारभव झाला.

 

१९९२ - या विश्वचषकमध्ये भारताने साखळी फेरीतील आपल्या लढती अगदी थोड्या फरकाने गमावल्या. इंग्लंडविरुद्ध पहिली लढत ९ धावांनी गमावलीे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत गेल्या विश्वचषकाची पुनरावृत्ती होऊन ही लढत भारताने एका धावेने गमावली. भारत आणि पाक हे पारंपरिक प्रतिस्पर्धी या विश्वचषकमध्ये पहिल्यांदाच आमने-सामने आले. भारताने २१६ धावा करून पाकला १७४ धावांत गुंडाळले. पहिला विश्वचषक खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने भारताकडून सर्वाधिक ५४ धावा करून विजयाला हातभार लावला. पण, भारताला उपांत्य फेरीही गाठता आली नाही.

 

१९९६ - या विश्वचषकमध्ये पहिली लढत केनियाविरूद्ध झाली. भारताने ७ विकेट राखून सहज विजय मिळविला. नंतर भारताने विंंडीजला ५ विकेटने नमवले. आॅस्ट्रेलियाविरूद्ध झाला. २५८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ २४२ पर्यंतच मजल मारू शकला. श्रीलंकेकडून ६ विकेटस्ने पराभव झाल्याने भारताची उपांत्य फेरी अडचणीत आली होती; पण त्यानंतर झिम्बाब्वेविरूद्ध ४० धावांनी विजय मिळवून भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली.पाकविरूद्ध विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरी लढतही भारताने सहज जिंंकली. या विश्वचषकामध्ये उपांत्यपूर्व फेरीत हे कट्टर प्रतिस्पर्धी बंगलोरच्या चिन्नास्वामी मैदानावर आमने-सामने आले. या सामन्यात अविस्मरणीय ठरली ती अजय जडेजाची खेळी. शेवटच्या दोन-तीन षटकांत त्याने वकार युनूसची अशी ‘धुलाई’ केली कीे वकार अजूनही ‘ढँुढते रह जाता है.’ प्रत्युत्तरात भारताने पाकला ९ बाद २४८ वर रोखले आणि ३९ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. यावेळी जडेजाची ४० धावांची तुफानी खेळीच निर्णायक ठरली. ईडन गार्डनवर झालेल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने ८ बाद २५१ अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्याला उत्तर देताना श्रीलंकेने भारताची अवस्था ३४.१ षटकांत ८ बाद १२० अशी केविलवाणी केली होती. भारतीय संघाच्या या अवसानघातकी खेळीने प्रेक्षक भयंकर चिडले. आठवी विकेट पडताच ईडन गार्डनवर प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. मैदानावर रिकाम्या बाटल्या फेकण्यात आल्या, स्टेडियमच्या काही भागाला आगी देखील लावल्या. अखेर ही लढत श्रीलंकेला बहाल करण्यात आली.

 

१९९९ -भारताचा या स्पर्धेतील प्रवास पराभवाने सुरू झाला. द. अफ्रिकेने भारताचा ४ विकेटस्नी पराभव झाला. भारतीय संघ पुढच्या लढतीत दुबळ्या झिम्बाब्वेकडूनही हरला. दुबळ्या केनियावरील विजयाने भारताची गाडी रुळावर आली. हाच टेम्पो पुढच्या लढतीतही कायम ठेवत भारताने श्रीलंकेला १५७ धावांनी हरवले. टाँटन येथे झालेला हा सामना गांगुली व द्रविड यांच्यासाठी यादगार ठरला. सौैरव गांगुली (१८३) आणि राहुल द्रविड (१४५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३१८ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली. यजमान इंग्लंडला ६९ धावांनी हरवून भारताने सुपर सिक्समधील स्थान पक्के केले. येथे भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २२७ धावा केल्या. छोट्या धावसंख्येचा पाठलाग पाकिस्तानला जमला नाही आणि त्यांनी १८० धावांत नांगी टाकली. वेंकटेश प्रसादने २७ धावांत पाच बळी मिळवले आणि तो ‘सामनावीर’चा मानकरी ठरला. पण न्यूझीलंडकडून हरल्यामुळे सुपर सिक्समधूनच भारताचे आव्हान संपुष्टात आले.

 

२००३ - भारताचा पहिला सामना नेदरलँडविरूद्ध झाला. अपेक्षेप्रमाणे हा सामना भारताने ६८ धावांनी सहज जिंकला; पण यानंतर आॅस्ट्रेलियाने भारताला ९ गडी राखून हरवले. या कामगिरीमुळे भारतात संतापाची लाट उसळली. खेळाडूंविरूद्ध निदर्शने सरू झाली. मोहम्मद कैफ आणि राहुल द्रविडच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत लोकांची मजल गेली. पुढच्या सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेला ८३ धावांनी हरवून स्पर्धेतील सहभागी संघांना ‘आपण जागे’ झाल्याचा इशारा दिला. महत्त्वाची मॅच होती ती पाकिस्तानविरुद्ध. एक मार्च २००३ ला महाशिवरात्रीच्या दिवशीचा हा सामना सचिन तेंडुलकर विरुद्ध शोएब अख्तर असा बनला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २७२ धावा केल्या. पाकिस्तानची भिस्त होती अख्तरवर; मात्र सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला पहिल्या षटकापासून फोडून काढण्यास सुरुवात केली. त्याने थर्डमॅनच्या डोक्यावरून मारलेला षटकार, तर अख्तरच्या गर्वाच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करून गेला. सचिनने या सामन्यात ९८ धावांची खेळी केली. या खेळीमुळे भारताने पाकिस्तानची सहा गडी राखून नांगी ठेचली होती. सुसाट सुटलेली गाडी फायनलमध्ये अडली. अंतिम सामन्यात १२५ धावांनी विजय मिळवून आॅस्ट्रेलियाने अजिंंक्यपद कायम राखले.

 

२००७ - भारताची पहिली लढत सख्खे शेजारी असलेल्या बांग्लादेशशी झाली. हा भारताच्यादृष्टीने काळा दिवस होता. बांग्लादेशने भारताला पराभवाचा धक्का देत मोठी खळबळ उडवून दिली. ‘सुपर एट’ फेरीत जाण्यासाठी भारताला श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवणे आवश्यक होते. पण, येथेही टीम इंडियाचा बार फुसका निघाला. भारताचे या स्पर्धेतील आव्हान येथेच संपले. करोडो भारतीयांच्या आशा-आकांशा कॅरेबियन समुद्रात बुडवून संघ रिकाम्या हाताने माघारी परतला.