शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

George Floyd Death: दिग्गज खेळाडू उचलणार जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 15:45 IST

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे.

मिनेसोटा येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. पोलीस आणि प्रशासनाविरोधात तेथील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. 25मे पासून अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरातील पोलिसांविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाला जगभरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. क्रीडा विश्वातही जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा निषेध नोंदवला जात आहे. क्रीडा विश्वातून फ्लॉयडच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्याची मागणी जोर धरत आहे. जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च देशातील सर्वात श्रीमंत बॉक्सरनं उचलला आहे.

कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन! 

25 मे 2020 या दिवशी मिनियापोलीस पोलिसांनी जॉर्ज फ्लॉयड याला बनावट नोटा बनवण्या प्रकरणी अटक केली. पण, एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याची मान जवळपास आठ मिनिटे गुडघ्यानं दाबून ठेवली आणि त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेत निदर्शनं केली जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसच्या बंकरमध्ये लपण्याची वेळ आली. जॉर्ज फ्लॉयडच्या निधनानं पुन्हा एकदा कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटली आहे.

क्रिकेटमध्येही वर्णद्वेष; ख्रिस गेलनं सांगितली आपबीती

दिग्गज बॉक्सर फ्लॉयड मेवेदर यानं जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. फ्लॉयडच्या कुटुंबीयांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वीही मेवेदरनं माजी बॉक्सर गेनारो हेर्नांडेझ याच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला होता. हर्नांडेझ याचे 2011 साली वयाच्या 45 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले होते. 1998मध्ये मेवेदरनं हर्नांडेझला पराभूत करून पहिले जागतिक जेतेपद पटकावलं होतं.  दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीगमधील चेल्सी क्लबनं जॉर्ज फ्लॉयडच्या निधनाचा तीव्र निषेध करताना. दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral 

"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी

मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!

ब्रिस्बनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव

समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी

पाकिस्तानचे क्रिकेटपटू सरावाला लागले, पण कोरोनाचं गांभीर्य विसरले

 

टॅग्स :george floydजॉर्ज फ्लॉईडboxingबॉक्सिंग