मराठमोळ्या खेळाडूने जिंकलेले पहिले पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:45 AM2021-08-24T05:45:53+5:302021-08-24T05:46:10+5:30

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या या पदकवीरांचा घेतलेला हा आढावा...

The first medal won by a Maratha player in Paralympic | मराठमोळ्या खेळाडूने जिंकलेले पहिले पदक

मराठमोळ्या खेळाडूने जिंकलेले पहिले पदक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टोकियो ऑलिम्पिकनंतर आता क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे ते पॅरालिम्पिक स्पर्धेकडे. टोकियो येथेच २४ ऑगस्टपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत कोणते संघ पदकांची लयलूट करणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. १९६८ सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १२ पदके जिंकली असून यामध्ये चार सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या या पदकवीरांचा घेतलेला हा आढावा...

हीडलबर्ग १९७२
भारतीय सेनेत कार्यरत असलेल्या पेटकर यांनी जलतरणात भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा पराक्रम केला. त्यांनी ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ३७.३३ सेकंदाची वेळ देत विश्वविक्रमासह सुवर्ण पटकावले. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले. १९६५च्या भारत-पाक युद्धादरम्यान पेटकर यांनी आपला हात गमावला होता. यानंतर ते जलतरणाकडे वळाले होते. 

न्यूयॉर्क, स्टॉक मँडविल १९८४
 जोगिंदर सिंग बेदी यांनी गोळाफेकमध्ये रौप्य, तर थाळीफेक आणि भालाफेकमध्ये प्रत्येकी कांस्यपदक जिंकले. पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिकणारे भारतीय म्हणून जोगिंदर यांनी विक्रम केला आहे. 
 भीमराव केसरकर यांनी भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. याच स्पर्धेत जोगिंदर यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 

अथेंन्स २००४ 
देवेंद्र झांझरियाने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकत ६२.१५ मीटरची विश्वविक्रमी फेक केली. यासह पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची २० वर्षांपासूनची पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली. 
राजिंदर सिंग राहेलू याने या स्पर्धेत भारताला दुसरे पदक मिळवून दिले. पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १५७.५ किलो वजन उचलत कांस्य जिंकले.

रिओ २०१६ 
भालाफेकीत पुन्हा एकदा विश्वविक्रमासह देवेंद्रने सुवर्ण जिंकताना पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. आता टोकियोमध्ये देवेंद्र सुवर्ण हॅटट्रिकसाठी प्रयत्न करेल. 
उंच उडीमध्येच वरुण सिंग भाटी याने १.८६ मीटरच्या उडीसह कांस्यपदक जिंकले. वरुणची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली.
दीपा मलिक पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने गोळा फेकीमध्ये ४.६१ मीटरची फेक करत रौप्य दक जिंकले.

लंडन २०१२
गिरीश नागरजेगौडा हा लंडन पॅरालिम्पिक स्पर्धेत एकमेव पदक विजेता भारतीय ठरला. त्याने उंच उडीत १.७४ मीटरची उडी घेत रौप्य पदक पटकावले. या खेळात पदक जिंकणारा गिरीश पहिला भारतीय ठरला. 

Web Title: The first medal won by a Maratha player in Paralympic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.