शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 18:28 IST

Dipa Karmakar Retirement: दीपा कर्माकरला २०१६ साली खेलरत्न पुरस्कार तर २०१७ साली पद्मश्रीने गौरविण्यात आले

Dipa Karmakar Retirement: भारतातील क्रिडाप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी आली आहे. स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाने दमदार कामगिरी केली होती, मात्र तिचे पदक थोडक्यात हुकल्याने ती चौथ्या स्थानावर राहिली होती. त्यामुळे तिला पदक जिंकता आले नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी दीपा भारतातील पहिली महिला जिम्नॅस्ट ठरली होती. रिओ ऑलिम्पिकच्या व्हॉल्ट स्पर्धेत दीपा केवळ ०.१५ गुणांनी मागे राहिल्याने कांस्यपदक जिंकू शकली नव्हती. मात्र तिच्या चमकदार कामगिरीसाठी दीपाला २०१६ मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. तसेच पुढच्याच वर्षी म्हणजे २०१७ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

२०१८ मध्ये पटकावले सुवर्णपदक; 'गोल्डन गर्ल' म्हणून ओळख

२०१८ मध्ये दीपा कर्माकरने तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. ३१ वर्षीय दीपा कर्माकर हिला 'गोल्डन गर्ल' म्हणूनही ओळखले जाते. त्रिपुराची दीपा कर्माकर ही भारतीय जिम्नॅस्टिक्समधील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. तिने LEAP जिम्नॅस्टिक्स सुविधेला भेट दिली आणि तरुणांना तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची प्रेरणा दिली.

सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा

दीपाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दीपाच्या भावना तिने दीर्घ पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, 'खूप विचार केल्यानंतर मी जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेत असल्याचे ठरवले आहे. हा निर्णय सोपा नव्हता. पण आता योग्य वेळ आली आहे. जिम्नॅस्टिक हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग आहे. मला आठवते ती ५ वर्षांची दीपा, ज्या मुलीला सांगितले होते की ती सपाट पायांमुळे कधीच जिम्नॅस्ट बनू शकत नाही. पण आज मला माझेच यश पाहून खूप अभिमान वाटतो.

दीपाने निवृत्ती घेण्याचे कारण सांगितले

दीपाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप ताश्कंदमधील माझा शेवटचा विजय हा एक टर्निंग पॉइंट होता. तोपर्यंत मला वाटले की मी माझ्या शरीराला आणखी कष्ट देऊ शकेन. परंतु कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मन अजूनही मानत नसले तरीही मी निवृत्ती घेत आहे.

टॅग्स :Dipa Karmakarदीपा कर्माकरIndiaभारतpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार