शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धडाकेबाज ऋषभ पंतला "चान्स" मिळणार ?

By admin | Updated: July 9, 2017 16:34 IST

वेस्ट इंडिजविरूद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय संघाने 3-1 अशी खिशात घातली. या मालिकेसाठी भारतीय चमूमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि चायनामॅन गोलंदाज कुलदिप यादव यांचा समावेश होता.

ऑनलाइन लोकमत
किंगस्टन, दि. 9 - वेस्ट इंडिजविरूद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय संघाने 3-1 अशी खिशात घातली. या मालिकेसाठी भारतीय चमूमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि चायनामॅन गोलंदाज कुलदिप यादव यांचा समावेश होता. यापैकी कुलदिपने पाचही सामने खेळले मात्र ऋषभ पंतला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. अखेरच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळेल अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती मात्र, अखेरच्या सामन्यातही ऋषभला संधी न मिळाल्याने सोशल मीडियावर रोष व्यक्त झाला होता. त्यामुळे आज होणा-या एकमेव टी-20 लढतीमध्ये ऋषभ पंतला चान्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
या एकमेव टी-20साठी भारतीय संघ  भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. या वर्षीच्या सुरूवातीला इंग्लंडविरोधात बंगळुरू येथे झालेल्या टी-20 सामन्यात पंतला संधी मिळाली होती. धोनीनंतर भविष्यातील यष्टीरक्षक म्हणून पंतकडे पाहिलं जात आहे. याशिवाय या सामन्यात कर्णधार विराट कोहली सलामीवीराची भूमिका बजावेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला आली. या एकमेव टी-20त विराट कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून कोहली सलामीला येतो.
(ख्रिस गेल "रिटर्न्स", विराट येणार सलामीला ?)
पाच सामन्यांची वन-डे मालिका ३-१ अशी जिंकणाऱ्या भारताला टी-२० जिंकून मालिकेचा शानदार समारोप करायचा आहे. यासाठी ख्रिस गेलच्या फलंदाजीवर अंकुश लावावा लागेल. खराब फॉर्म आणि जखमांशी झुंज देणारा गेल १५ महिन्यांनंतर राष्ट्रीय संघात परतला. आयपीएलमध्येहीतो अपयशी ठरला होता.
 
विंडीज संघ या प्रकारात सध्या विश्वविजेता असून संघात गेलसह मार्लोन सॅम्युअल्स, सुनील नारायण, सॅम्युअल बद्रीसारखे मॅचविनर आहेत. टी-२० चा तज्ज्ञ कार्लोस ब्रेथवेट कर्णधार असेल. मागच्या वर्षी फ्लोरिडात भारताविरुद्धच्या टी-२० त ४९ चेंडूंत शतक झळकविणारा एव्हिन लुईस याचादेखील संघात समावेश आहे. या लढतीसाठी भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत कोहली सलामीला खेळण्याची शक्यता आहे. युवा ऋषभ पंतला दौऱ्यात प्रथमच संधी दिली जाईल. भविष्यातील वन-डे यष्टिरक्षक म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. कुलदीप यादवदेखील संघात असेल. तो वेगवान भुवनेश्वर व उमेश यादवनंतर फिरकीची बाजू सांभाळेल. विंडीजच्या आक्रमणाची भिस्त नारायण व बद्रीवर राहील. नारायण फलंदाजीत सलामीला खेळू शकतो.
उभय संघ असे...
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी.
 
वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युअल बद्री, रोन्सफोर्ड बीटन, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, जेसन मोहम्मद, सुनील नारायण, किरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, मार्लोन सॅम्युअल्स, जेरोम टेलर, चाडविक वॉल्टन, केसरिक विल्यम्स.
 
स्थळ : सबीना पार्क, किंग्जस्टन, जमैका
 
सामन्याची वेळ : रात्री ९ वाजल्यापासून