शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

आज रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचा अंतिम सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 03:11 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ । २५वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित २५व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. प्रभादेवी येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात बुधवारपासून कबड्डीच्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. रविवारी या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचा अंतिम सामना खेळला जाणार असून, संपूर्ण राज्याचे अंतिम सामन्याकडे लक्ष लागले आहे.

शुक्रवारच्या फेरीत बँक आॅफ बडोदा, न्यू इंडिया एशोरन्स, मुंबई बंदर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण या संघांनी शहरी पुरुष व्यावसायिक गटाच्या बाद फेरीत प्रवेश केला. शहरी व्यावसायिक पुरुषांच्या ‘ब’ गटात बँक आॅफ बडोदाने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र बँकेचे आव्हान २३-२१ असे मोडून काढत, या गटात अग्रक्रम मिळवून बाद फेरी गाठली. नितीन देशमुख, जितेश पाटील यांनी जोरदार सुरुवात करीत विश्रांतीला १७-११ अशी आघाडी घेतली, पण विश्रांतीनंतर महाबँकेच्या प्रवीण रहाटे, राकेश गायकवाड यांना सूर सापडल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली, पण सामन्याच्या निर्णयात फरक पडला नाही. गटात उपविजेतेपद मिळवत, महाबँकेनेदेखील बाद फेरी गाठली.

महिलांच्या बाद फेरीनंतर साखळी सामन्यांना सुरुवात झाली होती. ‘इ’ गटात जे.जे. हॉस्पिटलने स्नेहविकासला ३९-२० असे नमविले. पूर्वार्धात १८-१० अशी आघाडी घेणाऱ्या जे.जे.ने उत्तरार्धातदेखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय मिळविला. वैष्णवी चव्हाण, सविता कावळे यांना या विजयाचे श्रेय जाते. स्नेह विकासच्या रिया तावडे, आस्था कदम बºया खेळल्या. ‘क’ गटात अश्विनी शेवाळे, सायली कचरे, राजश्री पवार यांच्या चढाई-पकडीच्या भन्नाट खेळामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने वर्ध्याच्या युवक ग्रामीण मंडळाचा ३७-१८ असा पाडाव केला. मध्यांतराला २२-१० अशी विजयी संघाकडे आघाडी होती. युवक ग्रामीणकडून रक्षा भलये बरी खेळली.असा रंगला सामना...‘अ’ गटात नाशिकच्या रचना स्पोटर््सने महात्मा फुलेला ४३-०९ असे नमवित आगेकूच केली. ‘अ’ गटात ठाणे मनपाने आकाश स्पोटर््सवर ४४-०८ असा विजय मिळविला. ‘क’ गटात अमरहिंदने युवा ग्रामीणचा ४७-१० असा पाडाव केला. या सलग दुसºया पराभवाने युवा ग्रामीनचा बाद फेरी गाठण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लागला होता. ‘फ’ गटात स्वस्तिक मंडळाने श्रीराम पालघरवर ३३-२१ अशी मात केली. पूर्वार्धात ०७-१० अशा पिछाडीवर पडलेल्या स्वस्तिकने जोरदार कमबॅक करीत हा विजय मिळविला.शनिवारीच्या फेरीत पुरुष शहरी या गटात आठ संघ खेळले.याशिवाय ग्रामीण संघातून आठ तर महिला संघातून १८ संघ खेळविले गेले. हे सामने रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या संघांनी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी चांगली खेळी खेळून प्रेक्षकांचे मन जिंकले.

टॅग्स :Mumbaiमुंबई