शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नरिंदर बत्रा यांचा अध्यक्षपदाचा अर्ज दाखल, भारतीय आॅलिम्पिक संघटना निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 02:04 IST

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरला. ‘आयओए’ची सर्वसाधारण सभा १४ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदासाठी सोमवारी अर्ज भरला. ‘आयओए’ची सर्वसाधारण सभा १४ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे. या सभेमध्ये ‘आयओए’च्या नव्या पदाधिका-यांची निवड करण्यात येणार आहे.बात्रा यांनी तीन सेटमध्ये आपला अर्ज भरला असून, यातील एक प्रस्ताविक असून एक अर्ज समर्थनक आहे. बत्रा यांचे नाव प्रस्तावित करण्यामध्ये ‘आयओए’चे महासचिव राजीव मेहता यांचा समावेश असून, खजिनदार अनिल खन्ना यांनी बत्रा यांना समर्थन दिले आहे. विशेष म्हणजे, याआधी खन्ना यांना ‘आयओए’ अध्यक्षपदासाठी दावेदार मानले जात होते. त्याच वेळी, बत्रा यांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठीही तीन सेटमध्ये आपला अर्ज भरला आहे.आयओएचे माजी सरचिटणीस राजीव मेहता यांनी पुन्हा सरचिटणीस पदासाठी आणि भाजपा राष्ट्रीय परिषदेचे माजी सदस्य सुधांशू मित्तल यांनी उपाध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे.मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत विविध पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. यानंतर, संध्याकाळी ५ वाजता इच्छुक पदांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. दरम्यान, बत्रा यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती. ‘आयओए’च्या वतीने एका अधिकाºयाने सांगितले की, ‘२०१२ आणि २०१४ साली कार्यकारी परिषदेचे सदस्य राहिलेले उमेदवारही अध्यक्षपद आणि महासचिव पदाची निवडणूक लढवू शकतात.’बत्रा यांनी २०१२ ते २०१४ या काळात उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून, ते कार्यकारी परिषदेचे सदस्य नव्हते. तसेच, मावळते अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी याआधीच आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत