कोलकाता : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी येथे मारहाणीच्या घटना होत आहेत. शनिवारी स्पर्धेतील सर्वांत जास्त उत्सुकता असणाऱ्या या सामन्याच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. धर्मशाळा येथून सुरक्षेच्या कारणास्तव येथे हा सामना हलविण्यात आला आहे. ईडन गार्डनवर होणाऱ्या सामन्याची तिकिटे मोहामेडन टेंटच्या बाहेर मिळतात. मात्र, या सामन्याची तिकिटे येथे मिळणार नसल्याचा फलक येथे लावण्यात आला आहे. या सामन्याची तिकिटे फक्त आॅनलाईनच मिळणार आहेत. तरीही तिकीट खिडकीवर प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.या सामन्यासाठी १५००, १००० व ५०० रुपयांची तिकिटे उपलब्ध आहेत. आॅनलाईनसह बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न संस्थांकडेही तिकिटे उपलब्ध आहेत.
भारत-पाक सामन्याच्या तिकिटांसाठी मारामारी
By admin | Updated: March 18, 2016 03:36 IST