शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

FIFA World Cup 2022, Wales vs Iran: इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा राग वेल्सवर काढला; आशियाई विजेत्या इराणने इतिहास घडविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:40 IST

सध्या कतारच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

कतार : सध्या कतारच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज विश्वचषकाच्या सहाव्या दिवशी आशियाई संघ इराणने वेल्सचा पराभव करून पहिला विजय मिळवला. ग्रुप बी मध्ये वेल्सविरुद्धच्या सामन्यात इराणने नियमित वेळेनंतर इंज्युरी टाइममध्ये दोन गोल करून सामन्यावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह इराणचे तीन गुण झाले आहेत. तर वेल्सचे दोन सामन्यांत केवळ एक गुण आहे. इराणच्या संघाला आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लिश संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 

वेल्सचा वेन हेनेसी हा रेड कार्ड मिळवणारा विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरा गोलरक्षक ठरला आहे. त्याआधी १९९४ मध्ये इटलीचा गोलरक्षक जियानलुका पेग्लियुका याला नॉर्वेविरुद्ध बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या इटुमलेंग कुनेला २०१०मध्ये उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात रेड कार्ड मिळाले होते.

इराणने उघडले विजयाचे खाते इराणच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आजच्या सामन्यात त्यांनी पहिला गोल करून अभियानाची शानदार सुरूवात केली. रमीन रझियानने इंजरी टाइममध्ये (९०+११) गोल केला. यानंतर इराणच्या रुबेज चेश्मीने सामना संपण्याच्या एक मिनिट आधी गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने इंजरी टाइममध्ये गोल करून वेल्सला पराभवाचा धक्का दिला. लक्षणीय बाब म्हणजे या विश्वचषकातील पेनल्टी क्षेत्राबाहेर केलेला हा पहिला गोल आहे. कारण आतापर्यंत झालेले सर्व गोल पेनल्टीमध्ये आले आहेत. अखेर इराणने वेल्सवर २-० ने विजय मिळवून स्पर्धेत आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. 

दरम्यान, वेल्स आणि इराण या दोन्ही संघाना ७० मिनिटांपर्यंत एकही गोल करता आला नव्हता. नियोजित ९० मिनिटांची वेळ उलटून गेली तरी दोन्ही संघाच्या खात्यात भोपळा होता. मात्र इंजरी टाइममध्ये इराणने जोरदार पुनरागमन करून इतिहास घडवला.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२FootballफुटबॉलIranइराणQatarकतार