नवी दिल्ली : चॅम्पियन्स टेनिस लीगला (सीटीएल) 17 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आह़े मात्र, त्यापूर्वीच आयोजकांना झटका बसला आह़े कारण जागतिक क्रमवारीतील 1क् व्या नंबरचा खेळाडू डेव्हिड फेरर याने या लीगमधून दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला आह़े या लीमध्ये हा खेळाडू पंजाब मार्शल्सचे प्रतिनिधित्व करणार होता़
स्पेनचा टेनिसपटू असलेला फेरर म्हणाला, की मी चॅम्पियन्स लीगमध्ये खेळू शकणार नाही, याची खंत आह़े त्यामुळे पंजाबमधील आपल्या प्रशंसकांची माफी मागतो़ गत सहा आठवडय़ांपासून मी विविध स्पर्धामध्ये व्यस्त होतो़ सलग सामने खेळल्यामुळे पाठीच्या दुखापतीमुळे सतावले आह़े त्यामुळेच मी शंभर टक्के फीट नाही़ याच कारणामुळे मी लीगमधून माघार घेतली आह़े
लीगचे संस्थापक आणि माजी खेळाडू विजय अमृतराज यांनी फेरर लीगमध्ये खेळणार नसल्याबद्दल खेद व्यक्त केला़ ते म्हणाले, की डेव्हिड फेररसारखा अनुभवी खेळाडू चॅम्पियन्स टेनिस लीगमध्ये पंजाब संघाकडून न खेळणो हा मोठा धक्का आह़े आता आम्हाला लवकरच पर्यायी खेळाडूची निवड करावी लागणार आह़े (वृत्तसंस्था)
भारतात टेनिसला गती मिळेल : येलेना यांकोविच
नवी दिल्ली : चॅम्पियन्स टेनिस लीगच्या (सीटीएल) आयोजनामुळे भारतात टेनिसला आणखी गती मिळण्यास मदत होईल, असे मत जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन टेनिसपटू येलेना यांकोविच हिने व्यक्त केले आह़े 17 नोव्हेंबरपासून सुरूहोणा:या या स्पर्धेत ही सर्बियन खेळाडू दिल्ली ड्रीम्स टीमचे प्रतिनिधित्व करणार आह़े दिल्ली संघात दक्षिण आफ्रिकेचा केविन अँडरसन, जुआन कालरेस फरेरो आणि भारताचा सनमसिंह यांचा समावेश आह़े अमेरिकन ओपनमध्ये 2क्क्8 ला येलेना फायनलमध्ये पोहोचली होती़ त्यानंतर तिने नंबर वनचा ताज मिळविला होता़