शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रिओ ऑलिम्पिक,पॅरा ऑलिम्पिक व महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार समारंभ संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 19:05 IST

रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने आज रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

मुंबई - रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने आज रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडामंत्री  विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे सत्काराचा कार्यक्रम पार पडला. रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये उपविजयी संघातील खेळाडूंचा आजचा सत्कार म्हणजे या खेळाडूंचे खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला आहे. तसेच या सत्कारामुळे अन्य खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

रिओ ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपट्टू साक्षी मलीक (५० लाख), हरियाणा, मार्गदर्शक कुलदिप सिंग(२५ लाख), ॲथलेटिक्स ललीता बाबर (७५ लाख), मार्गदर्शक भास्कर भोसले (२५ जाख), रोईंगपट्टू दत्तू भोकनळ (५० लाख), हॉकीपट्टू देविंदर सुनिल वाल्मिकी(५० लाख), मॅराथॉनपट्टू कविता राऊत(५० लाख), नेमबाजीपट्टू आयोनिका पॉल (५० लाख), लॉन टेनिसपट्टू प्रार्थना ठोंबरे (५० लाख) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रिओ पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू उंचउडी- मरिय्यप्पन थंगावेलू (१ कोटी), मार्गदर्शक सत्यनारायण (२५ लाख), भालाफेक- देवेंद्र झाझरिया (१ कोटी), राजस्थान, मार्गदर्शक सुनिल तंवर (२५ लाख), गोळाफेक - दिपा मलीक (७५ लाख), हरियाणा, मार्गदर्शक वैभव सरोही (१८.७५ लाख), उंचउडी - वरुन भाटी (५० लाख), नोयडा, मार्गदर्शक सत्यनारायणा (१२.५० लाख), जलतरण - सुयश जाधव (५० लाख) यांचाही रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ उपविजेते ठरले. या संघामध्ये महाराष्ट्राच्या क्रिकेटपट्टू असलेल्या मोना मेश्राम (५० लाख), पुनम राऊत (५० लाख), स्मृती मानधना (५० लाख), संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य (१० लाख), फिजोओ थेरेपिस्ट रश्मी पवार (१० लाख) व सायकल पट्टू ओमकार जाधव (६ लाख) यांचाही सन्मान करण्यात आला.