शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

फेडरर उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 03:43 IST

यूएस ओपन : बिगर मानांकित बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव्हने केला पराभव

न्यूयॉर्क : यूएस ओपन टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. बल्गेरियाचा बिगरमानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह याने तिसरा मानांकित फेडररला तीन तास १२ मिनिटांच्या संघर्षात ३-६, ६-४, ३-६, ६-४, ६-२ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ७८ व्या स्थानी असलेल्या बल्गेरियाच्या दिमित्रोव्हने याआधी फेडररशी झालेले सातही सामने गमावले होते. त्यामुळे या सामन्यातही फेडरर त्याला मात देईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे सामना सुरू झाला आणि पहिला सेट फेडररने २९ मिनिटात ३-६ असा सहज जिंकला. त्यानंतर दुसरा सेट दिमित्रोव्हने ६-४ असा जिंकला. तिसरा सेट पुन्हा फेडररने ३-६ ने जिंकला. पण त्यानंतरचे दोन्ही सेट जिंकत दिमित्रोव्हने फेडररला पराभवाचा धक्का दिला.

उपांत्य सामन्यात दिमित्रोव्ह दानिल मेदवेदेवविरुद्ध शुक्रवारी झुंजणार आहे. तळाच्या रँकिंगमध्ये असलेला खेळाडू स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची २८ वर्षांतील ही पहिलीच वेळ ठरली. फेडरर २००८ नंतर येथे जेतेपद जिंकू शकलेला नाही. दिमित्रोव्ह याआधी २०१४ आणि २०१७ च्या विम्बल्डन तसेच आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. २३ वर्षांच्या मेदवेदेव याने तीनवेळचा ग्रँडस्लॅम विजेता स्टॅन वावरिंका याचा ७-६, ६-३, ३-६, ६-१ ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. पाचवी मानांकित स्वितोलिनाने ब्रिटनची जोहाना कोंटा हिच्यावर ६-४,६-४ ने विजय मिळविला. अमेरिकन ओपनची उपांत्यफेरी गाठणारी युक्रेनची ती पहिली खेळाडू बनली. (वृत्तसंस्था)दुखापतीचा बहाणा नाही - फेडरर‘यूएस उपांत्यपूर्व सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव याच्याकडून पराभूत झाल्याचे शल्य असले तरी पराभवासाठी पाठीच्या दुखण्याचे कारण देणार नाही,’ असे मत दिग्गज रॉजर फेडररने व्यक्त केले. मागील सात सामन्यात दिमित्रोवला नमविणाऱ्या फेडररला पहिला आणि तिसरा सेट जिंकल्यानंतरही पाच सेटमधील संघर्षात बिगर मानांकित खेळाडूकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले. पाठीचे दुखणे बळावल्याने फेडररने अखेरच्या सेटपूर्वी मेडिकल टाईमआऊटदेखील घेतला होता.पाच सेटमधील हा चांगला सामना होता. काहीही घडू शकले असते. मी फार आनंदी आहे. सामन्यादरम्यान मी लढतीत कायम आहे नाही, असा स्वत:ला प्रश्न विचारत होतो.- ग्रिगोर दिमित्रोव्हसेरेनाचा विक्रमी १०० वा विजयसेरेना विलियम्सने अमेरिकन ओपनमध्ये १०० वा विजय नोंदवित उपांत्य फेरी गाठली. सेरेनाने चीनच्या वांगवर ६-१, ६-० ने सरळ सेटमध्ये विजय साजरा केला. सेरेना म्हणाली, ‘१०० सामने खेळणे अविस्मरणीय आहे. पहिल्यांदा या स्पर्धेत पाय ठेवला त्यावेळी १६ वर्षांची होते. इतके सामने खेळेल असा कधीही विचार केला नव्हता. 

टॅग्स :Tennisटेनिस