शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

संहितेचे पालन न करणाऱ्या महासंघांना मान्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:55 AM

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : क्रीडा संहिता हा कायदा असून कायद्याचे पालन न करणाऱ्या महासंघांना मान्यता देण्यात येऊ नये. ज्या ४१ राष्ट्रीय क्रीडा महासंघांना मान्यता देण्यात आली, त्या सर्वांनी संहितेचे पालन केले आहे, याची खातरजमा करण्याची अखेरची संधी दिल्ली उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे केंद्र सरकारला शुक्रवारी दिली. सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास क्रीडा सचिवांना सुनावणीच्यावेळी उपस्थित रहावे लागेल, असे न्या. विपिन सांघी आणि न्या. नजमी वजिरी यांच्या विशेष पीठाने म्हटले आहे. ‘आम्ही केंद्र सरकारला ६ नोव्हेंबर २०२०च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची अखेरची संधी देत आहोत. असे न झाल्यास पुढील सुनावणीच्यावेळी क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांना उपस्थित व्हावे लागेल. यासंदर्भात शपथपत्र दहा दिवसांच्या आत आत दाखल करावे लागेल,’ असे आदेशात म्हटले आहे. पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होईल. ४१ महासंघांना मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर विशेष पीठापुढे सुनावणी सुरू आहे. केंद्र शासनाचे वकील अनिल सोनी यांनी उत्तर दाखल करण्यास वेळ मागितला. याचिकाकर्ते राहुल मेहरा यांनी यास विरोध दर्शवून आधीच खूप वेळ देण्यात आला असून शपथपत्र दाखल करणारे अधिकारी हात झटकत असल्याचा आरोप केला. यावर नाराजी दर्शवून पीठाने ,‘ तुम्ही जो खेळ करीत आहात, तो बदला. क्रीडा संहितेचे पालन करण्यास काय अडसर आहे? जे महासंघ पालन करणार नाहीत त्यांना केंद्राची मान्यता मिळणार नाही. नियमानुसार चालणार असाल तर मान्यता मिळेल,’ असे याचिकाकर्त्याला सुनावले.