ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - जानेवारी महिन्यात इंग्लंडविरोधात झालेल्या टी-20 सामन्यात राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळल्यामुळे वादात अडकलेल्या क्रिकेटर परवेझ रसूलने अखेर मौन सोडलं आहे. खेळाला राजकारणाशी जोडलं जाऊ नये असं परवेझ रसूल बोलला आहे. कानपूरमध्ये टी-20 मॅचमध्ये डेब्यू करणा-या जम्मू-काश्मीरचा परवेझ रसूल राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळत असल्याने त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. त्याचा तो व्हिडीओही व्हायरला झाला होता.
परवेझ रसूल बोलला आहे की, 'क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेट खेळू दिलं पाहिजे. त्यांनी उगाच राजकारणात ओढलं जाऊ नये. मला माझं लक्ष खेळावर केंद्रित करायचं असून या असल्या वादामुळे माझ्या खेळावर परिणाम होऊ देणार नाही'. जम्मू काश्मीरमधून भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवणारा परवेझ रसूल पहिलाच खेळाडू आहे.
'आमच्याकडील क्रिकेटरस्ना राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं खूप कठीण काम आहे, आणि अशावेळी जेव्हा असे वाद होतात तेव्हा खुप दुख: होतं. माणसाने अशावेळी मजबूत राहण्याची गरज असून त्याला जास्त महत्व नाही दिलं पाहिजे', असं परवेझ रसूल बोलला आहे.
#parvezrasool chewing gum when national anthem ws played@TarekFatah@AskAnshul@AsYouNotWish@rishibagree@mahesh10816@Jaishankar_Singpic.twitter.com/t1wwvEFjS0— Swapnil Kumar (@raju2k84) January 26, 2017