शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आघाडी कमी करण्यात अपयश

By admin | Updated: November 19, 2014 04:09 IST

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा आजचा ८ वा डाव फारशा चकमकी न होता अवघ्या ४१ चालित बरोबरीत सुटला आणि तमाम भारतीयांची निराशा झाली.

जयंत गोखलेजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा आजचा ८ वा डाव फारशा चकमकी न होता अवघ्या ४१ चालित बरोबरीत सुटला आणि तमाम भारतीयांची निराशा झाली. आता अवघे ४ डाव शिल्लक राहिले आहेत आणि त्यातल्या दोन डावांत कार्लसनला पांढरी मोहरी असणार आहेत. कार्लसनला गाठून त्याच्यावर आघाडी घेण्यासाठी अनंदला आता आपला खेळ कमालीचा उंचवावा लागणार आहे. आनंदच्या पहिल्या डी ४ चालिला जेव्हा कार्लसनने तिसऱ्या डावात खेळल्या गेलेल्या प्रकाराने उत्तर दिले तेंव्हा एक अजून सनसनाटी डाव बघायला मिळणार असे वाटू लागले होते. तिसऱ्या डावात झालेल्या दारुण पराभवातून कार्लसनने नवीन चाल शोधली असणार असाचा सर्वांचा कयास होता. परंतु सातव्या चालीला कार्लसनने डावात बदल केला आणि सी ६ च्या ऐवजी सी५ खेळून आनंदला प्रत्युत्तर दिले. या पद्धतीतून काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्याला विनासायास बरोबरी मिळवीता येऊ शकते, असे प्रतिपाद गॅरी कास्पारोव्हने केले आहे. आपणास सर्वांना माहीत असेलच की कार्लसनची कार्यकिर्द घडवण्यात गॅरी कास्पारोव्हचा सिंहाचा वाटा आहे. डावाच्या मध्यभागात आनंदला थोड्या फार संधी होत्या परंतु त्याचे रुपांतर विजयात करता येऊ शकेल, अशी चिन्हे नव्हती अगदी ठराविक अंतराने दोघांची मोहरी अदलाबदल करुन पटावरुन नाहीशी होत गेली आणि शेवटी ४१व्या चालीला दोघांनी बरोबरी स्वीकारली या बरोबरीने कार्लसनचे ४.५ गुण तर आनंदचे ३.५ गुण आहेत. उद्या विश्रांतीचा दिवस असणार आहे. ९ वा डाव गुरुवारी असेल आणि यांत कार्लसन पांढरी मोहरी घेऊन खेळणार आहे.