शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

चांगली कामगिरी करून करार वाढविण्यास उत्सुक

By admin | Updated: April 8, 2017 23:51 IST

स्वीडनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचच्या निलंबनानंतर सुंदरलँडविरुद्धच्या सामन्यासाठी मँचेस्टर युनायटेड संघात सामिल झाला आहे. मँचेस्टर युनायटेड

- झ्लाटन इब्राहिमोविचशी केलेली बातचितस्वीडनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचच्या निलंबनानंतर सुंदरलँडविरुद्धच्या सामन्यासाठी मँचेस्टर युनायटेड संघात सामिल झाला आहे. मँचेस्टर युनायटेड हा संघ चेल्साकडून आॅक्टोबर महिन्यात ०-४ ने पराभूत झाल्यानंतर आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. पण यामध्ये दहा सामने अनिर्णीत आहेत. यामुळे त्यांनी २० गुण गमावले आहेत. यातील शेवटचा सामना संघाचे होम ग्राउंड असलेल्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात सुंदरलँडबरोबर १-१ असा ड्रॉ झाला. यात इब्राहिमोविचने पेनाल्टीवर केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधता आली. या आठवड्याच्या शेवटी प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. आज, रविवारी सुंदरलँड विरुद्ध मँचेस्टर युनायटेड असा सामना रंगत आहे. या सामन्यातून इब्राहिमोविच सत्रात पुनरागमन करीत आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून मँचेस्टर युनायटेडसोबतचा आपला करार वाढवण्यासाठी ३५ वर्षीय इब्राहिमोविच उत्सुक असेल. याबाबत त्याच्याशी केलेली बातचित...हा सिझन तुझ्यासाठी नक्कीच चांगला गेला आहे. ४२ सामन्यांत २७ गोल ही कामगिरी ३५व्या वर्षी नक्कीच चांगली म्हणावी लागेल. इंग्लंडमध्ये खेळल्यामुळे तू दिवसेंदिवस तरुण होत चालला आहेस का?मलाही तसेच वाटते... माझी कामगिरी दरवर्षी चांगलीच होते, यंदाही मी त्याची पुनरावृत्ती केली आहे, इतकेच. पण काही लोक अजूनही ही गोष्ट स्वीकारायला तयार नाहीत.तुला हे जमणार नाही, असे लोकांना वाटत होते, त्यांना खोटे ठरवण्यासाठी तू इंग्लंडला आलास का?सर्वांत महत्त्वाचे हे आहे की, माझा कशावर विश्वास आहे, मी काय ठरवले होते, आणि त्याच दृष्टीने माझी वाटचाल सुरू असते, बाकी कोणी काही म्हणोत, हा त्यांचा प्रश्न आहे. संघासोबतच्या तुझ्या कराराला मुदतवाढ मिळेल, असे तुला वाटते का?-बघूया काय होतंय ते!, बऱ्याच गोष्टी आता स्थिरस्थावर झाल्या आहेत. माझा खेळ आता एक दोन वर्षेच शिल्लक आहे. क्लब काय निर्णय घेतो, यावर सगळ्याच गोष्टी अवलंबून आहेत.संघ चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरला तरच तुझा करार वाढवण्यात येईल, असे बोलले जाते, त्याबाबतीत काय सांगशील?माझा करार आणि चॅम्पियन लीगची पात्रता याचा काहीही संबंध नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरत आहे. यावर्षीच्या जबरदस्त कामगिरीची पुन्हा पुढील वर्षी पुनरावृत्ती होईल असे तुला वाटते का?पुढच्या वर्षी मला जे काही करणे शक्य आहे, ते मी करणारच. मी माझ्या कामगिरीवर कधीही समाधानी नसतो. जे मिळवले आहे, त्याच्यापेक्षा आणखी जास्त मिळण्याचे ध्येय असते. तो माझ्या आयुष्यातील पुढचा अध्याय असेल.आणखी किती वर्षे तू खेळणार आहेस?, चाळिशीपर्यंत खेळू, असे तुला वाटते काय?कारकिर्दीच्या शिखरावर असताना थांबायला मला आवडेल. माझा खेळ ज्यावेळी चांगला होणार नाही, माझ्यामुळे संघाला फायदा होणार नाही, असे मला वाटले की खेळायचे थांबवेन. इतरांसारखे मी मागील पुण्याईवर संघात स्थान अडवून ठेवणार नाही. (पीएमजी)