शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक खेळाला कोहलीसारख्या भक्कम नेतृत्वाची गरज- राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 22:40 IST

वर्षातून एकवेळ ‘क्रीडा दिन’ साजरा करुन क्रीडा संस्कृती रुजणार नसल्याचं राज्यपाल म्हणाले

मुंबई :  ‘क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या शानदार नेतृत्वाखाली भारतीय संघाला भक्कम केले. तसेच त्याने आपल्या संघाला एक लक्ष्य निर्धारित करून दिले. या जोरावरच भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्यात यश आले. त्यामुळेच आज प्रत्येक खेळामध्ये कोहलीसारख्या भक्कम नेतृत्वाची गरज आहे,’ असे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी म्हटले.रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथे २०१७-१८ सालाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी मल्लखांब खेळासाठी स्वत:ला झोकून दिलेले आणि या मराठमोळ्या खेळाला आंतरराष्ट्रीय चेहरा देणारे मुंबईचे ज्येष्ठ प्रशिक्षक उदय देशपांडे यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने, तर साताऱ्याच्या प्रियांका मोहिते यांना गिर्यारोहणातील शानदार कामगिरीसाठी साहसी खेळाचा शिवछत्रपती पुरस्कार राज्यपाल आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे, १५ क्रीडा मार्गदर्शक ७ क्रीडा संघटक-कार्यकर्ते, ९ दिव्यांग खेळाडू आणि विविध खेळांमध्ये महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या ५५ खेळाडू यांचाही राज्यपाल व क्रीडामंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांचे स्मरण करताना यंदाचा पुरस्कार सोहळा साधेपणाने करण्यात आला. त्याचवेळी सोहळ्यादरम्यान जीवनगौरव पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांच्या शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरच्या खेळाडूंनी मल्लखांबचे नेत्रदीपक आणि थरारक सादरीकरण करुन उपस्थितांना खिळवून ठेवले. त्याचप्रमाणे, धारावी क्रीडा संकुलातील युवा खेळाडूंनी जिम्नॅस्टिक्स सादरीकरणाने सोहळ्यात रंगत आणली. खेळांना दैनंदिन जीवनात महत्त्व देणे गरजेचे असल्याचे नमूद करताना राज्यपाल म्हणाले की, ‘भारत आज विकसित देश म्हणून नावारुपास येत आहे. प्रत्येक विकसित देश खेळांमध्येही पुढे असून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर हे दिसून येते. २०२० सालापर्यंत आपला देश सरासरी २९ वय असलेला जगातील सर्वात युवा देश बनेल. त्यामुळे भारतीयांनी क्रीडा स्पर्धांमध्ये वर्चस्व राखले पाहिजे,’ असे राज्यपाल म्हणाले. ‘आज प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये एकदिवस ‘वार्षिक क्रीडा महोत्सव’ आयोजित केला जातो. असे कार्यक्रम किंवा उपक्रम केवळ एकच दिवस का साजरे होतात असा प्रश्न मला नेहमी पडतो. वर्षातील एक दिवस ‘स्पोर्ट्स डे’ साजरा करुन आपल्या देशात क्रीडा संस्कृती रुजणार नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात खेळांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असेही राज्यपाल राव यांनी यावेळी सांगितले. 

शहिदांच्या कुटुंबियांना खेळाडूंची मदतराज्यपाल आणि क्रीडामंत्री यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुण्याची बुद्धिबळपटू सलोनी सापळे आणि मुंबई उपनगरचा स्क्वॉशपटू महेश माणगावकर यांनी शिवछत्रपती पुरस्कार म्हणून मिळालेले रोख एक लाखाचे पारितोषिक पुलवामा अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन जवानांच्या परिवारास मदत म्हणून दान केले. यावेळी सलोनी म्हणाली की, ‘मी माझ्या पुरस्काराची रोख रक्कम पुलवाम येथे शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून सुपूर्द करत आहे. आज भारतमातेच्या जवानांच्या सतर्कतेमुळेच आम्ही खेळाडू सुरक्षितपणे सराव करु शकतो आणि त्यामुळेच आम्ही राज्याचे व राष्ट्राचे नाव उंचावू शकतो. त्यामुळेच माझ्याकडून जवानांच्या कुटुंबियांसाठी छोटी मदत करत आहे.’ स्क्वॉशपटू महेश माणगावकर सध्या जर्मनीत असल्याने तो या सोहळ्यास उपस्थित नव्हता. मात्र त्याच्यावतीने पुरस्कार स्वीकारताना त्याचे वडिल दयानंद माणगावकर यांनी म्हटले की, ‘महेश सध्या जर्मनीत आहे. त्याला या पुरस्काराचे स्वरुप माहित नाही. मात्र त्याने म्हटले होते की, या पुरस्कारासोबत जी काही रक्कम मिळेल ती सर्व शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून द्या.’ 

आज पालकांचा खेळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल असून ही खूप चांगली बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यास प्रोत्साहन मिळत आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंना सरकारी नोकरीसाठी प्राधान्य देतानाच अशा खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार थेट नियुक्तीही देण्यात येत आहे.- विनोद तावडे, क्रीडामंत्री  

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली