शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

युरो चषक फुटबॉल : युक्रेनचा उडवला ४-० असा धुव्वा, केनचा धडाका; इंग्लंड उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 09:07 IST

रोम : कामगिरीत सातत्य न राखता आल्याने टीकेला सामोरे जात असलेल्या हॅरी केनने अखेर आपला जलवा दाखवला. त्याने केलेल्या ...

रोम : कामगिरीत सातत्य न राखता आल्याने टीकेला सामोरे जात असलेल्या हॅरी केनने अखेर आपला जलवा दाखवला. त्याने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना युक्रेनचा ४-० असा धुव्वा उडवला. (Euro Cup football: Ukraine beat 4-0, England in the semi-finals)यंदाच्या युरोमध्ये पहिल्यांदाच इंग्लंडचा सामना वेम्बले स्टेडियमच्या बाहेर झाला. रोम येथील स्टेडिओ ऑलिम्पिकोमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने एकहाती वर्चस्व राखले. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर चौथ्याच मिनिटाला गोल करत केनने इंग्लंडला आघाडीवर नेले. यानंतर हॅरी मॅग्युअर याने ४६ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर केनने ५०व्या मिनिटाला पुन्हा एक गोल करत इंग्लंडची आघाडी ३-० अशी भक्कम केली. युक्रेनने दुसऱ्या सत्रात पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. जॉर्डन हेंडरसन याने ६३व्या मिनिटाला इंग्लंडचा चौथ्या गोल करत संघाचा विजय निश्चित केला. विशेष म्हणजे इंग्लंडने सलग पाचव्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखले आहे. १९६६ सालानंतर पहिल्यांदाच इंग्लंडने मोठ्या स्पर्धेतील बाद फेरीत खेळताना चार गोल करण्याची कामगिरी केली आहे. १९६६ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडने जर्मनीला ४-२ असे नमवले होते. इंग्लंड संघ आता पुन्हा लंडनला परतणार असून, बुधवारी त्यांचा सामना डेन्मार्कविरुद्ध होईल. डेन्मार्कने बाकू येथे झालेल्या सामन्यात झेक प्रजासत्ताकला २-१ असे नमवले  होते.

टॅग्स :FootballफुटबॉलItalyइटली