शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

By admin | Updated: February 3, 2017 05:02 IST

सुखम माझी (नाबाद ६७), गणेश मुंडकर (नाबाद ७८) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय दृष्टिहीन संघाने अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड

नवी दिल्ली : सुखम माझी (नाबाद ६७), गणेश मुंडकर (नाबाद ७८) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय दृष्टिहीन संघाने अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड संघाचा १० गडी राखून पराभव केला. इंदूर येथील होळकर मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना इंग्लंड संघाचा डाव १९.४ षटकांत १५८ धावांवर संपुष्टात आला. यात जस्टिन हॉलिंग्सवर्थ (२४), नॅथनील फॉय (७), लुक सुज (१६), एडवर्ड होसेल (५७), डॅनियल फिल्ड नाबाद (११) यांनी धावा केल्या. भारताकडून केतन पटेल (२-४०), वेंकटेश राव (१-२०), सुनील (१-१२), सोनू गोलकर (१-१७), इक्बाल जाफर (१-१०) यांनी सुरेख गोलंदाजी करून विजयाचा पाया रचला. या लढतीसाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आॅफ ब्लाइंड (वृत्तसंस्था) - भारत संघाने हे आव्हान ११ षटकांत एकही गडी न गमावता १५९ धावा काढून पूर्ण केले. यात सुखम माझीने ३२ चेंडंूत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा व गणेश मुदाकरने ३४ चेंडंूत १५ चौकारांच्या साह्याने नाबाद ७८ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. संक्षिप्त धावफलक : इंग्लंड : १९.४ षटकांत सर्व बाद १५८ धावा (जस्टिन हॉलिंग्सवर्थ २४ (१७ चेंडू, ३ चौकार), नॅथनील फॉय ७ (६ चेंडू), लुक सुज १६ (१८ चेंडू), एडवर्ड होसेल ५७ (३४ चेंडू, ७ चौकार), डॅनियल फिल्ड नाबाद ११ (१२ चेंडू), केतन पटेल २-४०, वेंकटेश राव १-२०, सुनील १-१२, सोनू गोलकर १-१७, इक्बाल जाफर १-१०) पराभूत वि. भारत : ११ षटकांत बिनबाद १५९धावा (सुखम माझी नाबाद ६७ (३२ चेंडू, १२ चौकार), गणेश मुंडकर नाबाद ७८ (३४ चेंडू, १५ चौकार). भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यासाठी इंदौरमधील सुमारे २५ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यामध्ये ७५ ते ८०% प्रेक्षक हे महाविद्यालयीन युवक व युवती होत्या. या सामन्याकडे फक्त मनोरंजन म्हणून नाही तर शिक्षण आणि साहस या दृष्टिने पाहिला. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मला येवून विचारले की, हे अंध क्रिकेट कसे खेळतात. मग मी त्यांना सीस्याचे लहान गोळे असलेला चेंडू दाखविला आणि या अंध क्रिकेटसंबंधी थोडी माहिती व नियम सांगितले. हे ऐकून त्यांना नवल वाटले, की बीसीसीआयचे क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. तेथे आपण फक्त सामन्याचा आनंद लुटतो, पण या दृष्टिहीन खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखेसुद्धा आहे. असे विचार त्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मांडले.- डॉ. अनिल भंडारी, अध्यक्ष, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड.