शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

इंग्लंडने कांगारूंना पाजले पाणी

By admin | Updated: August 1, 2015 00:32 IST

पहिल्या डावात जेम्स अँडरसन आणि दुसऱ्या डावात स्टीव्हन फिन यांची धारदार गोलंदाजी आणि त्यानंतर इयान बेलची अर्धशतकी खेळी याबळावर इंग्लंडने तिसऱ्या अ‍ॅशेज कसोटी सामन्यात

बर्मिंगहॅम : पहिल्या डावात जेम्स अँडरसन आणि दुसऱ्या डावात स्टीव्हन फिन यांची धारदार गोलंदाजी आणि त्यानंतर इयान बेलची अर्धशतकी खेळी याबळावर इंग्लंडने तिसऱ्या अ‍ॅशेज कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले १२१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ३२.१ षटकांत फक्त २ गडी गमावून १२४ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून इयान बेल याने ९0 चेंडूंत १0 चौकारांसह ६५ आणि जो रुट याने ६ चौकार, एका षटकारासह नाबाद ३८ धावांची खेळी केली.कुक (७) आणि लिथ (१२) हे सलामीवीर ५१ धावांत परतल्यानंतर इयान बेलने जो रुट याच्या साथीने २१ षटकांत नाबाद ७३ धावांची भागीदारी करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात ६ बळी घेणारा स्टीव्हन फिन सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. या दोन संघातील चौथा कसोटी सामना ६ ते १0 आॅगस्टदरम्यान नॉटिंगहॅम येथे होणार आहे.त्याआधी पीटर नेव्हिल आणि मिशेल स्टार्क यांच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासठी १२१ धावांचे लक्ष्य दिले होते. यष्टीरक्षक नेव्हिल (५९) आणि वेगवान गोलंदाज स्टार्क (५८) यांनी अर्धशतक ठोकतानाच आठव्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली; परंतु त्यानंतरही आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव २६५ धावांत आटोपला.तत्पूर्वी दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाच्या अव्वल ६ फलंदाजांत फक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (७७) हाच एकटा दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकला. दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन फिन याने त्याची सर्वोत्तम कामगिरी करताना ७९ धावांत ६ गडी बाद केले. त्याआधी त्याची सर्वोत्तम कामगिरी १२५ धावांत ६ बळी अशी होती. जी त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २0१0 मध्ये ब्रिस्बेन येथे केली होती. त्याआधी इंग्लंडला आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात एक जोरदार धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन गुरुवारी झालेल्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. संक्षिप्त धावफलक आॅस्ट्रेलिया : पहिला डाव १३६. दुसरा डाव : २६५.; (डेव्हिड वॉर्नर ७७, पीटर नेव्हिल ५९, मिशेल स्टार्क ५८, स्टिव्हन फिन ६/७९, जेम्स अँडरसन १/१५, स्टुअर्ट ब्रॉड १/६१, मोईन अली १/६४, स्टोक्स १/२८); इंग्लंड : पहिला डाव : २८१. दुसरा डाव : ३२.१ षटकात २ बाद १२४; (इयान बेल नाबाद ६५, जो रुट नाबाद ३८, लिथ १२, अ‍ॅलेस्टर कुक ७, हेजलवूड १/२१, हेजलवूड १/२१).