शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Emotional : ... म्हणून कॅप्टन कूल अनुपने निवृत्तीसाठी निवडला हा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:06 IST

अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

ठळक मुद्देजयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार अनुप कुमार निवृत्त2016 मध्ये भारताला जिंकून दिला होता विश्वचषकलवकरच दिसणार नव्या भूमिकेत

मुंबईः  अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. खेळाडूच्या आयुष्यात यशापयश येतच राहतात, पण तो माघार घेत नाही. कबड्डीत अनेकांचा आदर्श असलेल्या अनुपही तसाच लढवय्या, परंतु यावेळी त्याने घेतलेला निर्णय पचनी पडलेला नाही. प्रो कबड्डी लीगच्या 2018च्या मोसमात अनुपला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जयपूरसोबतच्या अखेरच्या सामन्यानंतर त्याला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेत मैदानाला प्रदक्षिणा घातली.  यंदाच्या मोसमात त्याने 13 सामन्यांत 50 गुणांची कमाई केली. त्याच्या नेतृत्वाखाली जयपूरला 14 पैकी 4 सामने जिंकता आले. अनुपने प्रो कबड्डी लीगमध्ये 91 सामन्यांत 596 गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सहाव्या स्थानी आहे. त्याने एक भावनिक व्हिडीओ पोस्ट करून ही निवृत्ती जाहीर केली. त्यात त्याने निवृत्तीसाठी 19 डिसेंबरची निवड का केली, यामागचं कारण सांगितल.तो म्हणाला, ''मैदानावर अनुप अनुप हा नारा खुप मिस करणार. निवृत्तीसाठी मी आजचाच दिवस का निवडला, हे सांगायचे आहे. 19 डिसेंबर हा माझ्या मुलाचा वाढदिवस आणि यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. या खेळ आता युवकांचा आहे आणि त्यामुळे मला येथेच थांबायला हवं. इतकी वर्ष भरभरून प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे आभार.''

2006 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. दक्षिण आशियाई स्पर्धेत त्याने भारतीय संघात पदार्पण केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 मध्ये विश्वचषक उंचावला. 2012 मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. निवृत्तीनंतर काय करणार, या प्रश्नावर त्याने सस्पेन ठेवला आहे. त्याने चाहत्यांना लवकरच नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे कबुल केले. 

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीKabaddiकबड्डी