कोलकाता : विजय हजारे करंडकातील कमी धावसंख्येच्या सामन्यात झारखंडने सौराष्ट्र संघावर ४२ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात ५२.४ षटकांच्या खेळात ईडनच्या खेळपट्टीवर २० गडी बाद होताच विजयी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने क्युरेटरशी चर्चा केल्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ईडनचे क्युरेटर सुजान मुखर्जी यांची भेट घेत धोनीने विकेटवरील हालचालींविषयी जाणून घेतले.झारखंड संघ २७.३ षटकांत १२५ धावांत बाद झाल्यानंतर सौराष्ट्र संघाला त्यांनी २५.१ षटकांत अवघ्या ८३ धावांत गारद केले. सामना संपताच धोनी मुखर्जी यांना भेटला. ही चर्चा पाच मिनिटे रंगली. बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी संयुक्त सचिव मुखर्जी म्हणाले,‘ या चर्चेला अधिक महत्त्व दिले जाऊ नये. या खेळपट्टीवर चेंडू अधिक वेगाने आत येत होता. धोनी मात्र तक्रार करण्यासाठी आला नव्हता. मी देखील या विकेटबाबत समाधानी नाही. चेंडू आवश्यकतेपेक्षा अधिक स्विंग होत असून वळण घेत आहे असे मला देखील जाणवले. धोनी मला भेटायला आला होता. १९ वर्षे गटात तो खेळत असताना मी पूर्व विभागाचा कोच होतो. मागच्या सामन्याच्यावेळी मी येथे नव्हतो त्यामुळे तो मला भेटायला आला. खेळपट्टी फारच धोकादायक वाटत असल्याने दोन्ही संघाचे प्रत्येकी तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. झारखंडचा इशन किशन हा सामन्यात अर्धशतक ठोकणारा एकमेव फलंदाज ठरला.
ईडनवर ५२.४ षटकांत पडल्या २० विकेट
By admin | Updated: March 2, 2017 00:23 IST