शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय किक बॉक्सिंगमध्ये दुर्वांक पाताडेला रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 20:14 IST

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा वरवडे(कणकवली) येथील सेंट उर्सुलाचा विद्यार्थी दुर्वांक राजेंद्र पाताडे याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

वैभववाडी: राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा वरवडे(कणकवली) येथील सेंट उर्सुलाचा विद्यार्थी दुर्वांक राजेंद्र पाताडे याची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत अझरबैजान(युरोप) येथे होणा-या 'युराशिया किक बॉक्सिंग चँपियनशिप' स्पर्धेत दुर्वांक देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.पाटणा(बिहार) येथील पाटलीपुत्र स्पोर्टस् स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत 40 ते 45 वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणा-या दुर्वांक पाताडेने रौप्यपदकांची कमाई केली. या चमकदार कामगिरीमुळे त्याचा अझरबैजान येथे होणा-या आंतरराष्ट्रीय 'युराशिया किक बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात दुर्वांकचा समावेश झाला आहे.दुर्वांक हा गणराज स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, मुंबईचा प्रशिक्षणार्थी असून त्याला अ‍ॅकॅडमीचे सचिव अविनाश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या खेळाचे बाळकडू त्याला सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरमध्ये मिळाले होते. राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविल्याबद्दल महाराष्ट्र किक बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष सत्यविजय राऊत यांनी दुर्वांकचे अभिनंदन केले असून, सिंधुदुर्गासह राज्यातही त्याचे कौतुक होत आहे.