शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: June 14, 2016 03:57 IST

राऊल रुइडियाज याने केलेल्या वादग्रस्त गोलच्या जोरावर पेरुने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य ब्राझीलला १-० असा धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली.

फाक्सबोरी : राऊल रुइडियाज याने केलेल्या वादग्रस्त गोलच्या जोरावर पेरुने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य ब्राझीलला १-० असा धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. विशेष म्हणजे या पराभवानंतर ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आले आहे, तर अन्य एका सामन्यात इक्वाडोरने हैतीचा ४-० असा धुव्वा उडवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.अत्यंत अटीतटीच्या व रोमांचक झालेल्या सामन्यात अखेरच्या १६ मिनिटांत केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर पेरुने बाजी मारली. मात्र, या गोलवरून मोठा गदारोळ उठला. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी ब्राझीलला बरोबरी पुरेशी होती आणि त्यांनी त्याच दिशेने कूच केली होती. मात्र, रुइडियाजने केलेल्या गोलमुळे ब्राझीलचे स्वप्न धुळीस मिळाले.मध्यंतराला गोलशून्य बरोबरी राहिल्यानंतर ७५व्या मिनिटाला पेरुचा फॉरवर्ड रुइडियाज याने गोलपोस्टच्या जवळून गोल केला. मात्र, यावेळी त्याने हाताचा वापर केल्याचा आक्षेप ब्राझीलियन खेळाडूंनी केला. यावेळी रेफ्रीने आपल्या सहकारी रेफ्रीसह चर्चा करून हा गोल वैध ठरवला आणि याच गोलच्या जोरावर पेरुने बलाढ्य ब्राझीलला बाहेरचा रस्ता दाखविला. टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, गोल करताना चेंडू रुइडियाजच्या हाताला लागला होता. तसेच रेफ्रीने गोल वैध असल्याचा निर्णय दिल्यानंतरही रुइडियाज जोरजोरात हसत असल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे, १९८७ सालानंतर प्रथमच ब्राझीलवर या स्पर्धेत साखळी फेरीतच बाहेर होण्याची वेळ आली.दुसरीकडे इक्वाडोरने दणदणीत विजयाची नोंद करताना दुबळ्या हैतीचा ४-० असा फडशा पाडला. इनेर वालंशिया, जैमी अयोवी, ख्रिस्टियन नोबोआ आणि अंतोनियो वालेंशिया यांनी प्रत्येकी एक गोल करताना इक्वाडोरच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी इक्वाडोरच्या जबरदस्त आक्रमणापुढे हैतीचा काहीच निभाव लागला नाही. या विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या इक्वाडोरपुढे अमेरिकेचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)