शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्ना बर्मनला मिळाले विशेष शूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 04:43 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा- सहा बोटे असलेल्या पायाच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत.

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी सुवर्णमय कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा- सहा बोटे असलेल्या पायाच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. जर्मनीच्या ‘आदिदास’ या कंपनीने स्वप्नाला जोडे उपलब्ध करून दिले. दोन्ही पायाला सहा-सहा बोटे असल्याने स्वप्नाला नियमित जोडे घालण्यास फार त्रास जाणवतो. आदिदास कंपनीने स्वप्नाला जोड्याचा आकार घेण्यासाठी जर्मनीतील प्रयोगशाळेत नेले होते.

आपल्या नवीन जोड्या मिळाल्याचा आनंद व्यक्त करतांना स्वप्ना म्हणाली की “ मला मिळालेल्या या जोड्या पाहून मी उत्साही आहे. हे बूट घालून प्रशिक्षण घ्यायला या आधीच मी सुरूवात केली आहे. आणि मला हे कळते की मी आता दुखण्यावर लक्ष केंद्रित न करता खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. आता माझा प्रवास सुखकर होईल, मी आदिदासच्या भारतातील टीमची आभारी तर आहेच पण त्याचबरोबर ॲथलीट सर्व्हिसेस लॅब ने यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचीही आभारी आहे. मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते कीमाझ्या पायांकरता विशेष बूट तयार केले जातील. मी आता अधिक मेहनत करून देशासाठी अनेक पुरस्कार जिंकण्याचा प्रयत्न करीन.”

आदिदास ने एशियन गेम्स नंतर स्वप्ना बरोबर करार करून तिच्या प्रवासात सहकार्य करण्याचे ठरवले आणि ती जागतिक स्तरावर यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले. या आधीही आदिदास ॲथलीट सर्व्हिस लॅब ने सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या बरोबर अशा प्रकारे करार करून दुखापती पासून मुक्ती मिळवण्यासाठी व त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत व्हावी यासाठी बूट तयार केले होते.स्वप्ना बरोबरच आदिदास ने नुकतीच धावपटू हिमा दास आणि निखट झरीन यांच्या सह काही खेळाडूं बरोबर करार करून भारतातील तरूण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Indiaभारत