शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॉ चांगला मिळाला, पण स्पर्धा सोपी नाही; ऑलिम्पिक पदकाचा प्रवास आव्हानात्मक - पी. व्ही. सिंधू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 09:27 IST

रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूला महिला एकेरीमध्ये हाँगकाँगच्या एंगान यी (क्रमवारी ३४) आणि इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा (क्रमवारी ५४) यांच्यासह ‘जे गटात’ स्थान मिळाले आहे.

नवी दिल्ली : ‘टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मला अपेक्षित ड्रॉ मिळाला. मात्र, असे असले तरी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा प्रवास सोपा नसणार. ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक सामना आव्हानात्मक ठरेल,’ अशी प्रतिक्रिया भारताच्या ऑलिम्पिक पदकाची प्रबळ दावेदार असलेल्या स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केली.

रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूला महिला एकेरीमध्ये हाँगकाँगच्या एंगान यी (क्रमवारी ३४) आणि इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा (क्रमवारी ५४) यांच्यासह ‘जे गटात’ स्थान मिळाले आहे. पुरुष एकेरीत १५ व्या क्रमांकावर असलेल्या बी. साई प्रणीतला ‘डी गटात’ स्थान मिळाले असून यामध्ये नेदरलँड्सचा मार्क कालजोउ (२९ क्रमवारी) आणि इस्रायलचा मीशा जिल्बरमॅन (४७ क्रमवारी) यांचाही समावेश आहे. ‘मला मिळालेला ड्रॉ संमिश्र असून हा ड्रॉ सोपाही नाही आणि कठीणही नाही. 

सर्व सामने जिंकण्यासाठी मला पूर्ण योगदान द्यावे लागेल.’ पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकिरेड्डी यांना ‘अ गटात’ संघर्ष करावा लागेल. त्यांच्या सोबत ‘अ गटात’ अव्वलस्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या केविन एस. सुकामुजो आणि मार्कस एफ. गाइडोन या जोडीचाही समावेश आहे. 

एकेरी गटातील ४२ खेळाडूंना १४ गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वलस्थानी येणारा खेळाडू बाद फेरीत प्रवेश करेल. बॅडमिंटन स्पर्धेला २४ जुलैपासून सुरुवात होईल.दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीची उत्सुकता- सातव्या स्थानी असलेल्या सिंधूने सांगितले की, ‘ऑलिम्पिकमध्ये खेळणारे सर्वच खेळाडू विशेष लयीमध्ये असतात. प्रत्येक सामना महत्त्वाचा असून प्रत्येक सामन्यानुसार योजना बनवावी लागेल. ही ऑलिम्पिक स्पर्धा असून येथे काहीच सोपे नसते.’ 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonIndiaभारत