शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टकट घेऊ नका, मेहनतीला पर्याय नाही- गौरव शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 00:46 IST

शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा अत्यंत आव्हानात्मक खेळ म्हणून पॉवरलिफ्टिंगची ओळख आहे. शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होणाऱ्या पॉवरलिफ्टिंगमध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा समज अनेकांमध्ये असतो.

मुंबई : शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा अत्यंत आव्हानात्मक खेळ म्हणून पॉवरलिफ्टिंगची ओळख आहे. शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होणाऱ्या पॉवरलिफ्टिंगमध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा समज अनेकांमध्ये असतो. मात्र हा एक गैरसमज असून शुद्ध शाकाहार केल्यानेही तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरू शकता, असा नवा विश्वास पॉवरलिफ्टिंगमध्ये जागतिक अजिंक्यपद, राष्ट्रकुल आणि आशियाई स्तरावर सुवर्ण पदकाची कमाई करणाºया गौरव शर्मा या स्टार खेळाडूने दिला. भारताचा स्ट्राँगेस्ट मॅन आणि बाहुबली म्हणून ओळखल्या जाणा-या गौरवने नुकतीच ‘लोकमत’ मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी या खेळातील आव्हान, संधी यावर चर्चा करतानाच गौरवने युवा खेळाडूंना डोपिंगपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. तसेच ब्रिटन सरकारच्या वतीने हाउस आॅफ कॉमर्समध्ये गौरवचा विशेष सन्मानही करण्यात आला. यापलीकडे गौरव दिल्लीतील एका हनुमान मंदिरात पुजारी असून बजरंग बलीच्या आशीर्वादानेच जगात तिरंगा फडकावू शकलो, असे गौरव अभिमानाने म्हणतो. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली विशेष चर्चा...

तू पूर्णपणे शाकाहारी असून शारीरिक शक्ती कशी मिळवलीस?माझ्या खेळामध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा एक गैरसमज सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. पण तसे काही नाही. शुद्ध शाकाहार केल्यानेही तुम्ही ताकदवान होऊ शकता. शिवाय मी कोणत्याही प्रकारची सप्लिमेंटही घेतली नाही. मी कधीही डोपिंगसारख्या प्रकारात अडकलो नाही. पण मी जडीबुटीचे सेवन करतो. ‘किडाजडी’ नवाच्या जडीबुटीचा एक कोर्स मी करतो. तो खूप महागडा असून भारतीय खेळाडूसाठी ते परवडणारे नाही. या जडीबुटीची किंमत ४२ लाख रुपये किलो आहे. ही सर्वात महागडी जडीबुटी आहे. याचे उत्पन्न भारतात होत असून याचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात आहे.

या जडीबुटीचे महत्त्व काय?भारतात या जडीबुटीला गांभीर्याने घेतले जात नाही, पण विदेशात याला खूप मागणी आहे. चीनचे ९९ टक्के खेळाडू याचे सेवन करतात. त्यामुळेच आॅलिम्पिकमध्ये त्यांचे वर्चस्व दिसून येते. यामुळे ऊर्जा, क्षमता आणि तंदुरुस्ती कमालीची वाढते. याचा कोर्स हिमाचल प्रदेशात होतो आणि केवळ थंड वातावरणात केला जातो. नियमानुसार याचे सेवन करावे लागते. यामुळेच मी कधी डोपिंगमध्ये अडकलो नाही आणि डोपिंगची भीतीही वाटत नाही.

कुस्ती ते पॉवरलिफ्टिंग हा प्रवास कसा झाला?माझी सुरुवात कुस्तीपासून झाली. पण पाठीच्या दुखण्यामुळे कुस्ती सोडावी लागली. त्यानंतर मी शरीरसौष्ठवाकडे वळलो. तेथे मी खुल्या राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत सहभाग नोंदवला. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये मी सलग दोन वर्षे दिल्ली राज्य विजेता ठरलो. त्यानंतर काही अंतर्गत राजकारणाचा फटका बसू लागला. माझ्या हक्काचे पदक दुरावू लागले होते. त्यामुळे मी हा खेळ सोडला आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक भूपेंद्र धवन यांच्या मार्गदर्शनाखाली २००५ पासून पॉवरलिफ्टिंग खेळतोय.

युवा खेळाडूंना काय सांगशील?आज इंटरनेटच्या युगात शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी अनेक औषधे किंवा सप्लिमेंटचा वापर खेळाडू करतात. पण हा शॉर्टकट आहे. अशी अनेक औषधे डोपिंगच्या नियमांनुसार अवैध आहेत आणि एकदा का खेळाडू यात अडकले तर त्यांची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे मेहनत करा, त्याला पर्याय नाही.

शाकाहारी होण्यासाठी खेळाडूंना काय संदेश देशील?हा केवळ मानसिक खेळ आहे. यशस्वी कामगिरीसाठी इच्छाशक्ती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. हे सर्व काही चवीचे खेळ असतात. खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी मांसाहार करणे गरजेचे आहे, असे नाही. हा केवळ एक गैरसमज आहे. आज अनेक विदेशी खेळाडू शाकाहारी होण्यावर भर देत आहेत. कारण त्यांच्याकडे साक्षरता अधिक असल्याने त्यांना सर्व ज्ञान आहे. शाकाहारमध्ये वेगळीच शक्ती आहे आणि दीर्घायुष्यासाठी शाकाहारी व्हावेच लागेल.

टॅग्स :Mumbaiमुंबई