शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

जोकोविच जिंकला; ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून सर्वांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 08:08 IST

लसीकरणातून वैद्यकीय सवलत मिळाल्यावर जोकोविच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला.

ऑस्ट्रेलियन प्रशासनाने जोकोविचचा व्हिसा रद्द करून त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये ठेवताच जगभरातून असंख्य चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला. त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले होते. ‘जगभरातून तुम्ही मला दर्शवित असलेल्या पाठिंब्याबद्दल खूप आभार. मला पाठबळ जाणवत असून, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे,’ असे जोकोविचच म्हणाला होता.

नेमके काय घडले?   

लसीकरणातून वैद्यकीय सवलत मिळाल्यावर जोकोविच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला. मात्र, आठ तासांहून अधिक वेळ त्याला विमानतळावरच थांबवण्यात आले. कोरोना  लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. लसीकरणाचा नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता. त्यानंतर त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले.

जोकोविचने याविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या फेडरल आणि कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याचा व्हिसा पुनरावलोकन आणि परत पाठवणीचा निर्णय सोमवापर्यंत प्रलंबित ठेवला होता. जोकोविचच्या परत पाठवणीला आव्हान देण्यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात काही कागदपत्रे सुपूर्द केली. टेनिस ऑस्ट्रेलिया संघटनेने त्याला १ जानेवारीला लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्याचे प्रमाणपत्र दिले. काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरा झाल्याने ही सवलत मिळाल्याचा त्यात उल्लेख असल्याचा दावा वकिलांनी केला होता.

१६ डिसेंबर २०२१ रोजी जोकोविचच्या कोरोना चाचणीचा अहवालआधी पॉझिटिव्ह आला होता. मागील ७२ तासांत ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणे नाहीत, असे वैद्यकीय सवलतीच्या प्रमाणपत्रात म्हटले होते.ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन प्रशासनाने या खटल्याच्या तयारीसाठी न्यायालयाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. मात्र, गृहमंत्र्यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. जोकोविच २० ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी असून, ऑस्ट्रेलियन ओपन त्याने नऊ वेळा जिंकले. यंदा येथे विजेता बनल्यास तो रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यापुढे जाऊ शकेल.